पुणे : हिऱ्यांच्या दागिन्यांच्या वेगळेपणाने आणि रेखीव कलाकुसरीत सजलेल्या ‘इंट्रीया’ प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही पुणेकर रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी हि हिरेजडीत दागिन्यांची मोहिनी कायम होती.ख्यातनाम ज्वेलरी डिझायनर पूर्वा दर्डा-कोठारी व मुंबईचे प्रसिद्ध हिरे व्यापारी हर्निश सेठ यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले. सेनापती बापट रस्ता येथील जे. एम. मॅरियट हॉटेल येथे शनिवार- रविवार असे दोन दिवस हिरेजडीत दागिन्यांचे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अनोख्या कलाविष्काराने नटलेल्या,कोरीव कारागिरीने सजलेल्या दागिन्यांना पाहण्यासाठी रविवारी सकाळपासूनच गर्दी झाली. लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी स्वागत केले.हिरेजडित हार, कर्णफुले, अंगठ्या, ब्रेसलेट प्रत्येकाला आकर्षित करीत आहेत. रुबी, एमरल्ड, मीनाकाम, रोडिअम अशा विविधरंगी खड्यांचा वापर करून बनविलेले हिरेजडित दागिने प्रदर्शन पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते. परदापॅटर्नचे, इटालियन पॅटर्नचे दागिने तरुण वर्गाला विशेष भावत होते. पारंपरिक व आधुनिक कलकुसर आणि सफाईदार नक्षीकामातील नेकलेस, ब्रेसलेट, अंगठ्या या दागिन्यांवर तरुण, ज्येष्ठ दोघांनीही पसंतीची मोहोर उमटवली. प्रदर्शनात प्रत्येकवर्षी नवेपणा जाणवत असल्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया प्रदर्शनाला नेहमी भेट देणाऱ्या रसिक जाणकारांनी दिली. पुरूषांनाही कफलिंक्स, कुरत्याचे बटण एवढेच नव्हे तर फाऊंटन पेनसुद्धा हिरेजडीत असलयाने पुरूषांना भुरळ न पडले तरच नवल. त्यातील बारीक हिऱ्यांचे काम, नाजूकपणा आणि त्यातही जपलेलया साधेपणाला पुरुषवर्गाकडूनही दाद मिळाली. पहिल्या दिवसाप्रमाणे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही आपला किंमती वेळ या मौल्यवान वस्तूंसाठी देत खरेदीचा आनंद लुटला.यावेळी राहूल कन्स्ट्रक्शनचे विनोद चांदवाणी, विशाल चोरडीया,कृष्णकुमार गोयल, जितेंद्रभाई मुनोत, सुनैयना अग्रवाल, रोहित रणधीर, प्राजक्ता रणधीर, अशोक साव, पुष्पा साव, तृषला साव, काजल केसवाल, कांचन कुंबरे, रूपेश कुंबरे, श्वेता कणसे, स्वाती शॉ, कुसुम शॉ, मनिषा जैसवाल, सुलभा कणसे, कमल साकोरे, कुसुम मित्तल, मीना संघवी, टीना डिडवानिया, किंजल गोयल, ज्योती डिडवानिया, वनिता बोरा, अभय बोरा, उज्वला कुंभार, नीला कुंभार, नेहा मुनोत, सुष्मिता मुनोत, स्वाती मुंदडा, शेखर मुंदडा, अस्मिता जावडेकर, कल्पना जावडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. (प्रतिनिधी)
‘इंट्रिया’ प्रदर्शनाला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद
By admin | Published: January 18, 2016 1:05 AM