आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांच्या गाजलेल्या ' शूर शिपाई ' या कवितेवरून आम्हाला सुचलेली ही कविता... अर्थातच केशवसुत यांची विनम्रपणे माफी मागून...
नव्या युगातील नव्या दमाचा शूर शिपाई आहेकोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहेकोल्हापुरी पहिलवान मी, जरी नसे कोथरूडचाजिंकेनच मी लढाई, जरी नसेन या प्रदेशाचा ।। १।।
मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहेरयतेला मी गृहीत धरतो, जरी 'बाहेर' चा आहेजिकडे जावे तिकडे माझी सर्व भावंडे आहेतसर्वत्र खुणा आताच विजयाच्या मज दिसताहेत ।।२।।
कोल्हापूरचा 'पूरग्रस्त' मी आलो तुमच्या दारातनाराजी सोडून, पाठिंबा द्या मला तुम्ही जोरात' ताई ' गेली तरी ' दादा' आला, भाग्य तुमचे माना लढणार मी, मैदान मारणार, जरी नाराज ' सेना ' ।।३।।
' पालक' च आहे मी, काढेन रुसवा ह्यताईह्णचाभाऊबीज ओवाळणीने ठेवेन अखंड धागा प्रेमाचाझाली चिखलफेक, तरी त्रास नसे या चिखलाचाविसरू नका चिखलातच जन्म होतो ह्यकमळाह्णचा ।।४।।
नवखा आहे म्हणून मी, अस्वस्थता आहे जनीकलह कसा जाईल मिटुनी, चिंता वाटे हीच मनीतरीही साम्राज्य स्थापेन, येता काळ माझाच आहेप्रेषित ह्यनमोह्णचा, नव्या दमाचा शूर शिपाई आहे... ।।५।।
- अभय नरहर जोशी-