शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 8:47 PM

खरंतर मतदार हा राजा आहे आणि उमेदवार सेवक.. पण हल्ली नेमकी उलटी स्थिती आहे..उमेदवार राजा आणि मतदार सेवक झाला आहे.. त्याचं कारण पण तोच आहे...

- अभय नरहर जोशी-  

संगमनेर (जि. अहमदनगर) येथील शाहीर अनंत फंदी हे उत्तर पेशवाईत विशेष गाजलेल्या शाहिरांतील ज्येष्ठ शाहीर. त्यांनी ‘फटका’ हा काव्यप्रकार लोकप्रिय केला. महत्त्वाची गोष्ट डफ वाजवत कठोर-फटकळ भाषेत गाऊन समाजाला पटवून देणे म्हणजे ‘फटका’. अनंत फंदींच्या अनेक फटक्यांपैकी लोकप्रिय ‘बिकट वाट वहिवाट नसावी...’ या फटक्यावर आधारित हा फटका... मतदार-कार्यकर्ते-नेत्यांसाठी हा फटका खास निवडणुकीनिमित्त... (चाल : पारंपरिक)मतदारांसाठी...

बिकट वाट वहिवाट असो, तरी मतदाना तू सोडू नकोहक्क बजावून बैस आपला, उगा घरामध्ये बसू नकोसालसपण धरुनि निखालस, खोट्या आश्वासना फसू नकोअंगी जागृती सदा असावी, वाहवत तू जाऊ नकोनको मिंधेपणा तू घेऊ कुणाचा, डाग आपणा लावू नकोदान मतांचे करण्यासाठी मागेपुढती पाहू नकोबोटांवरती डाग शाईचा लावण्यास तू लाजू नकोमतदानावर रुसू नकोराग भलता काढू नकोदुर्मुखलेला असू नकोगप्पा फुकाच्या मारू नकोप्रलोभनांना फसू नकोपैसे घेऊनि मते भलत्यांना, पोटासाठी देऊ नको ॥ १ ॥

कार्यकर्त्यांसाठी...

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलू नकोप्रतिस्पर्धी बुडवाया, ‘मेवा’ देण्या झटू नकोमी मोठा शहाणा, बलाढ्यही गर्वभार हा वाहू नकोएकाहून चढ एक जगामधि, थोरपणाला मिरवू नकोनेत्यांच्या उसन्या बळे गोरगरिबाला तू गुरकावू नकोदो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेऊ नकोविडा पैजेचा उचलू नकोउणी कुणाचे डुलवू नकोहीनतेस अनुसरू नकोनेत्यांकडे भीक मागू नकोप्रसंगी तू पदरमोड कर, परंतु मिंधा राहू नको ॥ २ ॥

नेत्यांसाठी...

उगीच निंदा, स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नकोखुर्चीवरती बसण्यासाठी भलत्या गोष्टी करू नकोहक्काचे मतदान आपले, दुसºयांचे तू चोरू नकोसत्ता असली, नसली तरी मान सुख, कधि विटू नकोसत्कर्मातून धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटू नकोआता तुज गुजगोष्ट सांगतो, जनसेवा कधी सोडू नको‘तडजोडी’ करू नकोसमर्थकांना अंतरू नकोविरोधकांना हिणवू नकोमदतीस विस्मरू नकोसत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे तव मग शंकाच नको ॥ ३ ॥ 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान