(कालच्या पावसानंतर केलेले चिंतन आणि चिंता. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांची माफी मागून...)
नको नको रे पावसा...नको नको रे पावसाअसा धिंगाणा अवेळीफाडलीस मतांची झोळीविरोधक पिटती टाळी ।। १।।
नको नाचू तडातडाअसा सभास्थळांवरूननेते-कार्यकर्ते असेपुन्हा आणू मी कोठून? ।। २।।
नको करू झोंबाझोंबीमाझा पक्षच नाजूकहुकला नऊचा मुहूर्तबंद माईकचे बोंडुक ।। ३।।
आडदांडा नको येऊझेपावत आकाशातूनमाझे 'इंजिन' पाण्यातनको टाकू भिजवून ।। ४।।
मुंबईत बोललो थोडेमाझे पुण्यात ऐक नाचालले रे कार्यकर्तेत्यांना माघारी आण ना ।। ५।।
चालले रे मतदारजा रे आडवा धावतवीजबाई, कडाडूनफिरव तू जनमत ।। ६।।
आणि पावसा, राजसानीट आण सांभाळूनघाल कितीही धिंगाणामग मुळी न बोलेन ।। ७।।
थांब की रे थोडा वेळमज काहीच सुधरेनाजमवून लोक सारेकशी करू मी गर्जना ।। ८।।
सत्ता येणारच नाहीविरोधक मी होईनबंद व्हिडीओ तरीही‘नवनिर्माण’ करेन ।। ९।।
नको आणू रे पावसाअसा झाकोळ अवेळीदारामध्ये याआधीचफिरे ‘ईडी’ची सावली... ।। १०।। - अभय नरहर जोशी