- अभय नरहर जोशी-
(चाल : सुप्रसिद्ध लावणी - आता वाजले की बारा)कार्यकर्ते : निवडणुकीचा मोसम कसा आलाय भरातधड धड नेत्यांच्या काळजात मायेनाफिरायचं कवा, कुठं, कसं आम्ही झालो येडपिसंत्याचा नाही भरवसा, रात्री ‘तोल’ राहीना
राखिली की मर्जी ‘त्यांनी’, तिकीट मिळालेप्रचारात रंगुनि घामानं चिंब ओले सर्व झालेटीका केली जपून तरी काळ-येळ नाही बरीरात्री ‘बसू’, खाऊ थोडा तरी चखणा
चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’ ।।धृ।।
मतदार (कोरसमध्ये) : हे कशापायी छळता, मागं मागं फिरताअसं काय करता, सारखं काय येता हो आमच्या दारीयाची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली आता सभेसाठी गाडी निघाली
कार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’ ।।१।।
उमेदवार :याचक म्हणून आम्ही उभे मतदारांच्या उंबºयातखुर्चीचं हे येडं स्वप्न बाळगलं उरातपराभवाचं भय घाली निवडणूक ही चुरशीचीउगा गडबड कशापायी, हाये नजर आयोगाचीराजा रे, राणी गं, हाये नजर आयोगाचीविजय करण्या पक्का आपला, करू ताकद गोळा शीळ घाली ‘तिकडून’ कोणी करून तिरपा डोळा आता कार्यकर्ते कसे झाकू, सांगा कुठवर राखू याचं भान माझं मला राहिनाकार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’ ।।२।।
मतदार (कोरसमध्ये) : हे कशापायी छळता, मागं मागं फिरताअसं काय करता, सारखं काय येता हो आमच्या दारीयाची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली आता सभेसाठी गाडी ही निघाली...
उमेदवार :प्रचारानं घेतला वेग, सभा होती चौकाचौकांततप्त उन अंग जाळी, आवाज फुटना व्हटातकार्यकर्ते काही द्वाड, गोटात माझ्या राहिनाप्रचाराच्या डावपेचाचं मी कसं गुपित राखू कळंना हे .. राजा रं, रानी ग कसं गुपित राखू कळंना मोरावानी डौल माझा गरुडावानी तोराइलेक्शनला यंदा केला धीर गोळा निवडणुकीची लागलीया गोडी तरी कळ काढा थोडीघडी ही कसोटीची निभवूया...
कार्यकर्ते : चला जाऊ घरोघरीनाही तर वाजलेच ‘बारा’ ।।३।।