आमचं ठरलंय...
आश्वासनांचा पुन्हा पूर अन् पाणी भलतंच मुरलंयकुणाला सांगू नका, पण आता आमचं ठरलंय!
पाण्याखाली गेलेत रूळ, ‘रेल्वे इंजिन’ थबकलंय‘ईडी’पीडा टळली की धावायचं आमचं ठरलंय!
लढू म्हणणाºया कार्यकर्त्यांना नेत्यांनीच रोखलंयकाहीच नक्की ठरवायचं नाही, हेच आमचं ठरलंय!
‘भुजां’मधलं ‘बळ’ आम्ही आजमावून पाहिलंय‘मॅचिंग मफलर’च घालायची, असं आमचं ठरलंय!
‘उद्धवा’च्या अजब सरकारनं ‘नारायणा’स अडवलंयनाही तर ‘देवेंद्र’दरबारी जायचं, कधीच आमचं ठरलंय!
‘पॉवर’लेस होताच राजे-सरदारांनी आम्हाला सोडलंयगप‘वार’ सोसून, उलट वार करण्याचं आमचं ठरलंय!
खोट्या निष्ठावंतांनी बारा‘मती’ला पुरतंच गुंगवलंयजुना गडी म्हणे, लढेन नव्या गड्यांसह आमचं ठरलंय!
‘हैदराबादी बिर्याणी’नं बहुजनांना ‘वंचित’ ठेवलंयवेगवेगळ्या ताटांतच जेवायचं नक्की आमचं ठरलंय!
मारत ‘पंजे’ परस्परांनाच आम्ही स्वत:ला थकवलंयएकत्र येऊन लढायचंच नाही, असंच आमचं ठरलंय!
तळ्यात की मळ्यात, इथंच काहींचं गाडं अडलंयवाऱ्याची दिशा पाहून ठरवू, हेच तूर्त आमचं ठरलंय!
- अभय नरहर जोशी