शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पुण्याच्या उपमहापौरांच्या मुलावर बलात्कारप्रकरणी गुन्हा

By admin | Published: December 27, 2015 12:39 AM

उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलावर विनयभंग, बलात्कार, चोरी व शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलासह आणखी दोघे जण

पुणे : उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलावर विनयभंग, बलात्कार, चोरी व शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या दुसऱ्या मुलासह आणखी दोघे जण या गुन्ह्णात आरोपी आहेत. याबाबत एका ३८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.अमित बागुल, कपिल बागुल, तनुजा भागवत-रावळ आणि महादू अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. डिसेंबर २०११ मध्ये अमित बागुलने काशी यात्रेचे आयोजन केले होते. वाराणसी येथे पोहोचल्यानंतर संबंधित महिलेच्या खोलीत बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी अमितने दिली होती. अमित, कपिल आणि तनुजा यांनी पीडित महिलेला एका कॅफेमध्ये बोलवून तक्रार मागे घेण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पीडित महिलेविरुद्ध या पूर्वी काही अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. (प्रतिनिधी)हे राजकीय षडयंत्र : बागुल ज्या महिलेने हा आरोप केला तिचे वय व मानसिक तपासणी केल्यानंतर, यातील सत्य बाहेर येईल. माझा राजकीय उत्कर्ष सहन होत नसलेल्यांने मला बदनाम करण्यासाठी केलेले हे कारस्थान आहे, असा दावा उपमहापौर आबा बागुल यांनी केला आहे. सदर महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आपली काहीही तक्रार नाही, असे तिने पोलिसांना लिहून दिले होते. असे असताना आता ती पुन्हा बिनबुडाचे आरोप करीत आहे, यावरून तिच्या हेतूविषयी शंका येत आहे, असेही बागुल म्हणाले.