शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पुणे गेलं पाण्यात.. पावसाळी कामेच न झाल्याने शहरात साचली पाण्याची तळी

By admin | Published: May 14, 2014 7:48 PM

पुणे : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाची सुस्ती आज शहरात झालेल्या तासाभराच्या अवकाळी पावसाने उतरविली. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठीच्या जागेवर साठलेले पाण्याचे ढीग, मोठया प्रमाणात माती वाहून आल्याने तुंबलेल्या पावसाळी वाहिन्या आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने शहरातील जवळपास सर्व चौक आणि सखल भागांमध्ये तीन ते चारफूट पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळतर उडालीच मात्र या पाण्यामुळे चौका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा मनस्तापही पुणेकरांना सहन करावा लागला.

पुणे : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाची सुस्ती आज शहरात झालेल्या तासाभराच्या अवकाळी पावसाने उतरविली. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठीच्या जागेवर साठलेले पाण्याचे ढीग, मोठया प्रमाणात माती वाहून आल्याने तुंबलेल्या पावसाळी वाहिन्या आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने शहरातील जवळपास सर्व चौक आणि सखल भागांमध्ये तीन ते चारफूट पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळतर उडालीच मात्र या पाण्यामुळे चौका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा मनस्तापही पुणेकरांना सहन करावा लागला.शहरात गेल्या सहा महिन्यांपासून सीसीटीव्ही केबल, पालिकेच्या पाणी पुरवठा, डे्रणेज तसेच पावसाळी लाईन्स आणि सिमेंट रस्त्यांसाठी मोठया प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने खोदाई रस्त्यांच्या कडेला करण्यात आली आहे. त्यामुळे मातीचे ढीग रस्त्याच्या कडेस साचलेले होते. काम पूर्ण होताच या ठिकाणची माती उचलून हे रस्ते पुन्हा तत्काळ पूर्ववत करणे आवश्यक होते. मात्र, दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळा उशीरा सुरू होणार यामुळे प्रशासनाने त्याकडे जाणून बुजून दूर्लक्ष केल्याने त्याचा फटका आज पुणेकरांना सहन करावा लागला. आज झालेल्या मुसळाधार पावसाने ही रस्त्याच्या कडेची माती पाण्याबरोबर वाहत जावून या मातीने सर्व प्रथम पावसाळी गटारे तुंबली त्यातच पावसाळी गटारांची स्वच्छताही न झाल्याने अनेक ठिकाणी या गटारांमधून पाणी बाहेर येत होते. या पाण्याचा वेग इतका जास्त होता की सुमारे तीन ते चार फूट उंच या पाण्याचे फवारे उडत होते. ----------------------------चौका चौकात पाण्याची तळी शहरातील पावसाळापूर्व कामे 90 टक्क्याहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र हा दावा फोल ठरल्याचे आज झालेल्या पावसाने दिसून आले. पाऊस सुरू होताच अवघ्या काही मिनिटातच सखल भागात पाणीसाचण्यास सुरूवात झाली. मात्र, पाणी जाण्यास जागाच नसल्याने काही मिनिटातच टिळक चौक, खंडेजीबाबा चौक, डेक्कन बसथांबा, स्वारगेट चौक, कार्वेपुतळा चौक, अप्पा बळवंत चौक,कृषी महाविद्यालय चौक, विद्यापीठ चौक, कर्वेरस्ता परिसर,नगररस्ता परिसर, टिळक रस्त्यावर अनेक ठिकाणी , राजाराम पूल, पू.ल देशपांडे उद्यान परिसरातील रस्त्यासह सर्व प्रमुख चौकांमध्ये पाण्याची तळी साचली त्यामुळे नागरिकांना आपली वाहने काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली लागली.