शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

न्यायालयातील शिक्षेच्या प्रमाणात ६-१५ टक्क्यांनी वाढ

By admin | Published: March 15, 2017 8:44 AM

नाशिकमध्ये दोन वर्षांपासून न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या संशयितांची संख्या ७९५ आहे.

ऑनलाइन लोकमत/विजय मोरे

नाशिक, दि.15 - शहर पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाण्यांमध्ये किरकोळ व गंभीर अशा दोन्ही स्वरूपातील हजारो गुन्ह्यांची नोंद दरवर्षी होते. यापैकी अनेक गुन्ह्यांतील संशयितांची न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली जाते. मात्र गत दोन वर्षांपासून न्यायालयात शिक्षा होण्याचे प्रमाण ६ ते १५ टक्क्यांपर्यंत वाढले असून, पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेल्या संशयितांची संख्या ७९५ आहे. दरम्यान, काळानुरूप पोलिसांची बदललेली तपासाची पद्धती, सरकारी वकिलांचे परिश्रम व साक्षीदार या तिघांमुळे शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नाशिक शहरात चोरी, हाणामारी, घरफोडी, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, खून, बलात्कार, विनयभंगासारखे अनेक गुन्हे दाखल होत असतात. या गुन्ह्यांमध्ये दरवर्षी वाढ होते. २०१५ साली २५ प्रकारचे गुन्हे मिळून ३ हजार ६२० गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी २ हजार ६९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. तर २०१६ मध्ये गुन्ह्यांमध्ये घट होऊन ३ हजार ५३८ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २ हजार १९६ गुन्हे उघडकीस झाले. न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये निकालही लागले आहेत़ नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना शिक्षा करण्याचे प्रमाण अधिक आहे.

४५३ गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ६७५ संशयिताना पुराव्यांअभावी निर्दोेष सोडण्यात आले. या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण २०१४ साली ३२.१० टक्के होते. त्यानंतर २०१५ मध्ये यात घट झाल्याने ते प्रमाण २५.३१ टक्के झाले; मात्र २०१६ मध्ये यात वाढ होऊन ४०.१६ टक्के प्रकरणांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील गुन्ह्यांमध्येही शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ३३ गुन्हेगारांना शिक्षा झाली तर १२० गुन्हेगार निर्दोष सुटले आहेत. २०१५ चा विचार करता गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.न्यायालयात साक्ष व पुरावे महत्त्वाचे असतात़ मात्र, बहुतांशी साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती नसते. त्यामुळे साक्षीदारांकडून न्यायालयात साक्ष देतांना चुका होतात. या चुका होऊ नये यासाठी न्यायालयात असलेल्या प्रॉसिक्यूशन सेलमार्फत साक्षीदारांना न्यायालयीन प्रक्रियेची माहिती दिली जात असल्यामुळे त्यसांच्या मनातील भीती नाहीशी होते, व चुका कमी होतात. याचा चांगला परिणाम हो दोषसिद्धीमध्ये होत असल्याचे दिसून येते. - दत्तात्रय कराळे, उपायुक्त (गुन्हे) नाशिक़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील शिक्षेचे प्रमाणन्यायालय                        शिक्षा                  निर्दोष                   रद्द                                       वर्ष (टक्केवारी)                                                                                                                                २०१४          २०१५            २०१६  

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  ४५३                     ६७५                  ३३७                                  ३२.१०          २५.३१       ४०.१६ जिल्हा व सत्र न्यायालय       ०३३                    १२०                  ०००                                   ०९.४०          १५.५८      २१.५७