ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 18 - जानेवारी ते मार्च 2016 या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकला 5 ,367.14 कोटींचं आर्थिक नुकसान झालं आहे. पंजाब नॅशनल बॅंकेला झालेला हा तोटा बॅंकिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा तोटा आहे. थकित कर्जांचं प्रमाण वाढलं असल्या कारणाने बॅंकेला हा इतका मोठा तोटा सहन करावा लागला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. यावेळी ही माहिती देण्यात आली.
गतवर्षी याच तिमाहीत बॅंकेला 306 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षामध्ये चौथ्या तिमाहीत बॅंकेला 306.56 कोटी रुपयांचा नफा झाला होता. उत्पन्नामध्ये 1.33 टक्क्यांनी घसरण झाली असून थकित कर्जांमध्ये तीनपटाने वाढ झाली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या थकित कर्जांचा आकडा 10 हजार 485.23 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.