आप्पासाहेब पाटील
सोलापूर : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दसरा मानला जातो. या शुभमुहूर्ताचे औचित्य साधून सोलापूरकरांनी वाहन, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जमीन, जागा, घरगुती साहित्य आदी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती़ दसºयानिमित्त व्यावसायिकांनी ग्राहकराजावर विविध आॅफर्ससह सवलतींचा वर्षाव केल्याने बाजारात वस्तूंची जोरदार विक्री झाली.
सोलापूर शहरासह जिल्ह्यात साधारणपणे ३ हजार दुचाकी, ५०० चारचाकी व १०० अवजड वाहने रस्त्यावर आली आहेत. शिवाय सोने-चांदी, वाहन, रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, रेडिमेड कपडे, साडी शोरुम्ससह आॅनलाईन बाजार यामधून साधारणत: अंदाजे १२० कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन वस्तू, वाहन, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे खरेदी करण्यासाठीचा मुहूर्त म्हणजे दसरा अन् दिवाळी. यंदा दसºयाच्या सणानिमित्त सोलापूरच्या बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढली होती़ यंदा पडलेला मुबलक पाऊस आणि बाजारात आलेले चैतन्य यामुळे यावर्षीचा दसरा मोठी उलाढाल करणारा ठरला आहे़ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.
रिअल इस्टेट, वाहन बाजार, सोने-चांदी मार्केट, इलेक्ट्रॉनिक बाजारात चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोट्यवधींची उलाढाल झाली आहे़
मोबाईल, टीव्ही, फ्रीजला पसंती...- खास करून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती असून मोबाईल, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन,वॉटर प्युरीफायर, होम थिएटर, लॅपटॉपच्या खरेदीला ग्राहकांनी शुभमुहूर्तावर चांगली पसंती दिली़ एकीकडे आॅनलाईन मार्केटची क्रेझ वाढत असताना त्यांच्या तुलनेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील व्यावसायिकांनी वस्तूंसमवेत लकी ड्रॉ कूपन, सवलत, मोबाईल पॉवरबँक, आकर्षक हेडफोन आदी वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच वाढीव वॉरंटी देण्याचा मार्गही अवलंबला आहे. एलईडी टीव्हीसोबत होम थिएटरची आॅफर दिली जात आहे. ९९९ ते १४९९ रुपये डाऊन पेमेंट भरून हप्त्याने टीव्ही ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. मोबाईल खरेदीसाठी शोरुममध्ये तरुणाईने मोठी गर्दी केल्याचे दिसून आले़ इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी झीरो डाऊन पेमेंट, ईएमआय, शून्य टक्के व्याजासह कर्ज आदी सुविधाही देण्यात आल्या असल्याची माहिती विजय इलेक्ट्रॉनिक्सचे विजय टेके यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़
रिअल इस्टेटला अच्छे दिन...- विजयादशमीला सुमारे ५०० हून अधिक घरांचे नव्याने बुकिंग झाले आहे़ तर गेल्या दोन वर्षांत घर बुक केलेल्या सुमारे १ हजारांहून अधिक जणांनी नव्या घरात गृहप्रवेश केला आहे़ एकूण उलाढाल पाहिली तर सुमारे ७५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली़ दसºयानंतर येणाºया दिवाळीत आणखीन मोठ्या प्रमाणात घरांचे बुकिंग होणार आहे़ गेल्या आठ दिवसांपासून ग्राहकांच्या मिळणाºया वाढत्या प्रतिसादामुळे व्यापारी वर्गात चैतन्याचे वातावरण आहे. दसºयानिमित्त ७०च्या वर फ्लॅट, रो-हाऊसचे बुकिंग झालेले आहे. ही उलाढाल सुमारे ७५ कोटी रुपयांपर्यंतची असल्याचे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले़
सराफ बाजारात झळाळी...- दसºयानिमित्त सराफ बाजारातही उत्साही वातावरण होते़ या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. गतवर्षी याच दिवशी सोन्याचा भाव प्रतितोळा ३१ हजार ६०० रुपये एवढा होता. यंदा ३८ हजार २०० रुपये तोळा सोने होते़ यामुळे बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. मुहूर्तावर तुलनेने महाग मिळत असलेले सोने खरेदीसाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती़ यंदा उलाढाल मागील वर्षापेक्षा दुपटीने वाढलेली आहे़ सोन्या चांदीच्या दागिन्यांसह, निरंजन, आपट्यांची पाने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती़ साधारणत: सराफ बाजारात ५ कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफ व्यापारी मिलिंद वेणेगूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
यंदा बाजारात दसºयाच्या शुभमुहूर्तावर मोबाईल, फ्रीज, एलईडी टीव्ही, होम थिएटर, वॉटर प्युरीफायर आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती़ वित्तीय संस्थांनी दिलेल्या चांगल्या स्कीममुळे यंदा उलाढाल वाढली आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८ टक्क्याने खरेदी घटली आहे़- विजय टेके,विजय इलेक्ट्रॉनिक्स, सोलापूर
मंदीचे सावट असले तरी सोलापूरकरांनी यंदा दसरा खरेदीसाठी मोठा उत्साह दाखविला़ यंदा बाजारात दुचाकी, चारचाकी, कमर्शियल गाड्यांची खरेदी वाढली आहे़ साधारण: ३० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे़ आगामी दिवाळीत आणखीन वाहन विक्रीला चांगले दिवस येतील यात मात्र शंका नाही़- बाबू चव्हाण,चव्हाण मोटार्स, सोलापूर
यंदा दसरा सणाला रिअल इस्टेट क्षेत्रासाठी चांगले वातावरण होते़ मंदीचे सावट असले तरी ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला़ आपल्याकडे असलेली वस्तू व किंमत योग्य असली तर तुमच्या मालाला चांगलीच मागणी येईल यात मात्र शंका नाही़ त्यामुळे मंदीचा बाऊ न करता प्रामाणिकपणे उद्योग व्यवसाय करावा़- विरांग शहा,वीर हौसिंग, सोलापूर
मंदीच्या सावटाखाली व्यवसाय करणाºया सराफ व्यावसायिकांनी यंदाच्या दसºयाने चांगले तारले आहे़ सोन्या चांदीच्या भावात १० टक्के वाढ झाली़ दसºयाच्या खरेदीसाठी बाजारात उत्साह होता़ साधारणत: ५ कोटींची उलाढाल झाली असेल़ दिवाळीत आणखीन चांगला व्यवसाय होईल अशी आशा आहे़ मागील वर्षीपेक्षा यंदा सराफ बाजारातील खरेदी ५० टक्क्यांनी घटली आहे़- मिलिंद वेणेगूरकरसराफ व्यावसायिक, सोलापूर
दिवाळी सणात होणाºया लग्नसराईच्या खरेदीसाठी काही लोकांनी दसºयाच्या शुभमुहूर्तावर खरेदी केली़ दसरा व दिवाळीच्या खरेदीमुळे बाजारात शालू, प्रिंटेड साड्या, पैठणी, रेडिमेड कपडे, जिन्स, घागरा, चुडीदार, पंजाबी आदी कपडे खरेदीला ग्राहक मोठा प्रतिसाद देत आहेत़ दिवाळीत व्यवसाय वाढणार असल्याचा विश्वास आहे़- लक्ष्मीकांत चाटला,चाटला पैठणी, सोलापूर