पुणे : आडत व मुक्त व्यापारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी अद्याप बैठक घेतलेली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, ते बेमुदत बंदचा निर्णय घेऊ शकतात. राज्यभरातील व्यापाऱ्यांची पुण्यात पुढील आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले व फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली.नियमनमुक्तीच्या निर्णयाला राज्यातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नियमनमुक्ती केवळ बाजार आवाराबाहेर न करता बाजारातही करावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. भुसार बाजार व भाजीपाला विभागातील प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे राज्य सरकारने दोन्ही बाजारांचा एकत्रित विचार न करता स्वतंत्र धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल पुढील दिशा पुढील आठवड्यात ठरणार आहे.
व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: September 20, 2016 1:24 AM