शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

‘उजनी’तील पळसनाथ मंदिर उघडे

By admin | Published: April 27, 2016 2:12 AM

पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पूर्णपणे उघडे पडले आहे.

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळसदेव येथील भीमा नदीच्या पात्रात सन १९७५मध्ये जलसमाधी मिळालेले पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पूर्णपणे उघडे पडले आहे.या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला, तरी त्याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात ‘पलाशतीर्थ’ म्हणून आढळून येते. पळसनाथाच्या या हेमाडपंती मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात करण्यात आले आहे. शिखराची बांधणी सप्तभूमी पद्धतीची आहे. त्यासाठी पक्क्या विटा, चुना इत्यादींचा वापर करण्यात आला आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप, गाभारा आहे. उंच शिखर, लांब-लांब शिळा आहेत. विविध मदनिका, अलासकन्या, सुरसुंदरी, जलमोहिनी, नागकन्या अशी नावे देण्यात आली आहेत. ज्या वेळी एखादा भक्त मंदिरात प्रवेश करतो, त्या वेळी त्याने आपल्या मनातील वाईट भावना मंदिराबाहेरच सोडून निर्मळ मनाने मंदिरात प्रवेश करावा, या उद्देशाने ही महिलारूपी शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरलेली आहेत, असे इतिहासकार सांगतात.मूर्ती चौकोनी खांब, वतुर्ळाकार पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. शिल्प मूर्तींमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन वीरगळी, रामायण-महाभारतकालीन कलाकृती, इंद्राच्या दरबारात असणाऱ्या देवीदेवतांची शिल्पे, त्या काळातील अप्रतिम कोरीव काम, जडणघडण पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडते.मंदिराच्या आवारात गेले असता गाभाऱ्याच्या समोर असलेला नंदी भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराची पूर्ण रचना केवळ २७ दगडी नक्षीदार खांबांपासून तयार केलेली आहे. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे. शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा, याकरिता चारही बाजूंनी मोठमोठे सौने (मोठी छिद्रे) आहेत. मंदिराच्या आवारात प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच या तीन झाडांची खोडे फांद्यांसह आजही योद्ध्याच्या आविभार्वात कणखरपणे उभी दिसतात. मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बरीचशी पडझड झाली आहे; मात्र दिमाखदार आस्तित्व आजही कायम आहे.