ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ : बालभारती अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास- भाग २ या पुस्तकात अफझल खान वध चित्राच्या जागी शिवाजी महाराज व अफजल खान भेटीचेचित्र छापले आहे. त्याविरोधात नाराज झालेल्या हिंदू जनजागृती समितीने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारने चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू नये, म्हणून छापलेले पुस्तक मागे घेण्याची मागणी समितीचे प्रवक्ते उदय धुरी यांनी केली आहे. धुरी म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून शिवाजी महाराजांची युद्धनीती, स्फूर्तीस्थान असे धडेही वगळण्यात आले आहे. त्यामुळे हळूहळू शिवाजी महाराजांचा इतिहासच पुस्तकातून पुसून टाकण्याचा हा डाव आहे.
राज्य सरकारने येत्या सात दिवसांत नव्याने पाठ्यपुस्तके छापून विद्यार्थ्यांना योग्य इतिहास शिकवावा, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पुणे येथील शिक्षण सहसंचालक सुनील चव्हाण आणि बालभारतीचे विशेष अधिकारी मोगल जाधव यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.शिवाय शिक्षण सहसंचालकांना अफजल खान वधाचे छायाचित्र संस्थेनेनिवेदनासोबत भेट म्हणून दिले. मंत्रालयातही हे छायाचित्र लावण्याची मागणी वर्तक यांनी केली.................................तर मंडळ बरखास्त कराव्याकरणातील चुकांमुळे दरवर्षी चर्चेत राहणाऱ्या बालभारतीमुळे चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांमध्ये रुजवला जात असेल, तर मंडळ बरखास्त करण्याची मागणी अभय वर्तक यांनी केली. ते म्हणाले की, मुलांचे शैक्षणिक नुकसान न होता, योग्य इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे सात दिवसांत सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. अन्यथा सर्व हिंदूत्त्ववादी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करतील.