ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 05 - किनन आणि रुबेन हत्या प्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनील, सतीश, दीपक आणि जितेंद्र राणा यांनी २०११ मध्ये किनन आणि रुबेन यांची हत्या केली होती. मैत्रिणीची छेड काढणार्यांचा विरोध केला म्हणून 24 वर्षांचा किनन सँतोज आणि 28 वर्षांचा रुबेन फर्नांडिस यांची भर रस्त्यात चाकू भोसकूनं हत्या करण्यात आली.
'28 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात घेण्यात आली होती ज्यामधील पाच जण त्या ठिकाणी उपस्थित होते. यामध्ये किनन आणि रुबेन यांच्या दोन पिडीत मैत्रिणींचादेखील समावेश होता', अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. 'आरोपी छेड काढण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न करत होते याचे थेट पुरावे उपलब्ध आहेत. त्यावेळी पिडीतांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी धमकी दिली होती आणि त्यानंतर हत्यारांसोबत त्या ठिकाणी घेऊन हत्या केली होती', असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण ?
अंधेरी भागातल्या अंबोली रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यावर किनन, रुबेन आणि त्यांचे पाच मित्र रात्री अकरा वाजता पान खाण्यासाठी म्हणून बाहेर पडले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या जितेंद्र राणा या मुलाने केननच्या मैत्रिणीची छेड काढली आणि यावरुन किनन आणि जितेंद्र यांच्यात वाद झाला. या वादानंतर राणा तिथून गेला आणि थोड्या वेळातच आपल्या 20 मित्रांसोबत तो परत आला. त्यानंतर त्यांनी किनन आणि रुबेन यांची चाकू भोसकून हत्या केली.
Happy with life imprisonment to guilty.They should live every moment thinking about Keenan-Reuben: Keenan’s father pic.twitter.com/Bq2hrL45WJ— ANI (@ANI_news) May 5, 2016