अतुल जयस्वाल/अकोला : उत्पादनवाढीसाठी शेतकरी शे तामध्ये कोणत्या गुणवत्तेचे खत व कीटकनाशक वापरतो यावर कृषी क्षेत्रातील उत्पादकता अवलंबून असते. शेतकर्यांसाठी अ त्यंत महत्त्वाची असलेली रासायनिक खते व कीटकनाशके गुणवत्तापूर्ण आहेत की नाहीत, हे तपासण्याचे काम करणार्या गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या खत नियंत्रण व कीटकनाशक चाचणीच्या एकूण ९ प्रयोगशाळा राज्यात आहेत. या प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी त्यांचे अद्ययावतीकरण करण्याचा निर्णय शासनाने घे तला असून, त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २ कोटी रुपयांच्या तरतुदीला बुधवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. राज्यात कृषी विभागांतर्गत ५ खत नियंत्रण प्रयोगशाळा व ४ कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा, अशा एकूण ९ गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. राज्यातील विविध खत कंपन्यांमध्ये तयार झालेल्या रासायनिक खतांचे नमुने खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी येत असतात. ही खते उच्चतम गुणव त्तेची आहेत की नाही, याबाबतची तपासणी येथे केली जाते. अशाच प्रकारचे काम कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळांमध्ये हो ते. या प्रयोगशाळांची तपासणी क्षमता वाढविणे, तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्राप्त होण्यासाठी त्यांचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने ख त नियंत्रण प्रयोगशाळांसाठी १ कोटी व कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळांसाठी १ कोटी, अशा एकूण २ कोटी रुपयांच्या गुणव त्ता नियंत्रण प्रकल्पास १६ सप्टेंबर रोजी मान्यता दिली.
*प्रकल्पांतर्गत होणारी कामे या प्रकल्पांतर्गत नऊ प्रयोगशाळांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देणे, गौण बांधकामे करणे, सुट्या भागाद्वारे उपलब्ध उपकरणांची क्षमतावृद्धी करणे, प्रयोगशाळेतील अधिकार्यांना उपकरणे हाताळणी तसेच विश्लेषकांच्या विश्लेषणाबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स् तरावरील अद्ययावत प्रशिक्षण देणे, गौण उपकरणे खरेदी करणे, तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय बी परीक्षण संस्थेचे सभासदत्व मिळवून देण्यासाठी संबंधित संस्थांनी विहित केलेल्या सुविधा निर्माण करणे आदी कामे केली जातील.
*राज्यातील ९ प्रयोगशाळा
खत नियंत्रण प्रयोगशाळा - अमरावती, औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोल्हापूर कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळा - अमरावती, औरंगाबाद, पुणे, ठाणे