शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दरडीवरील झोपड्यांचा प्रश्न सुटेना

By admin | Published: May 01, 2017 7:07 AM

मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास एक महिना शिल्लक राहिला असला

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास एक महिना शिल्लक राहिला असला, तरी याकडे महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरडीलगतच्या झोपड्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय उचित कार्यवाही करत नसल्याने, हा प्रश्न दर पावसाळ्यात समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ३२७ ठिकाणांवरील २२ हजार ४८३ झोपड्यांना दरडीचा धोका आहे. सुमारे १.१५ लाख रहिवासी येथे राहात आहेत. सरकारने सुरक्षेची उपाययोजना म्हणून दरडीलगत संरक्षण भिंत बांधण्यास सुरुवात केली. मात्र, हे कामदेखील व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ, तसेच वाशीनाका येथील ओम गणेशनगर, राहुलनगर, नागाबाबा नगर, सह्याद्रीनगर, अशोकनगर, भारतनगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णूनगर या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापालिका प्रशासनातर्फे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी स्वत:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.""स्थलांतर न करता, तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर राहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.१९९२ सालापासून या कामी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, संरक्षक भिंत हा कायमचा उपाय नाही, तर सरकारने धोकादायक असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए आणि पालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्प बाधितांसाठी राखीव असलेल्या घरांमध्ये करणे गरजेचे आहे. मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडाचे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे दरडीलगतचे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.झोपड्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर आणि संरक्षक भिंती बांधल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती कोणी करायची, असे अनेक प्रश्न निरुत्तरित असल्याने हा गुंता सुटण्याऐवजी वाढतच आहे.१९९२ ते २०१३ या काळात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत २६० जणांचा मृत्यू झाला, तर २७० जण जखमी झाले.२४ तासांत सरासरी २०० मिलीमीटर पाऊस पडला, तर साधारणत: दरड कोसळण्याच्या घटना घडतात.खडकातली पाणी शोषण्याची क्षमता संपली की, त्यात भेगा पडतात. परिणामी, पाणी बाहेर पडून दगडाचा काहीसा भाग सुटतो आणि ढासळू लागतो.दरड कोसळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती रोखता येणार नाही. मात्र, त्यासाठी पुरेशी काळजी घेणे शक्य आहे.२०० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर, संबंधित ठिकाणी सुरक्षेचा इशारा दिला, तर दुर्घटनांमधील जीवितहानी टाळता येईल.