मुंबई : पुरातन वास्तू आढावा समितीच्या शिफारशीमुळे अखेर दादर, माटुंगा, परळ, लालबाग, वरळी आणि सायन येथील पुरातन इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग तीन वर्षांनंतर मोकळा झाला आहे़ त्यामुळे तणावाखाली असलेल्या येथील धोकादायक व जीर्ण इमारतींमधील रहिवाशांनी आनंदोत्सव साजरा केला़ दिनेश अफझलपूरकर यांच्या समितीने आपल्या अहवालातून दादर येथील हिंंदू व पारसी कॉलनी, वरळी बीडीडी चाळ, माटुंगा फाइव्ह गार्डन, माधववाडी, दस्तुरवाडी, चिंचपोकळी बटाटावाला चाळ आदींना हेरिटेजमुक्त करण्याची शिफारस केली आहे़ यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे़तीन वर्षांचा हा लढा यशस्वी झाल्यामुळे रहिवाशांनी अहवालाचे स्वागत केले आहे़ रहिवाशांच्या सूचना व हरकतींवर सकारात्मक विचार करून हिंदू कॉलनी हेरिटेजमुक्त करण्याचा निर्णय आढावा समितीने घेतला ही आनंदाची बाब आहे़ यामुळे येथील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होईल, असा विश्वास रहिवासी रमण व्यास यांनी व्यक्त केला़ माजी उपमहापौर आणि बाबूभाई भवानजी यांनीही या अहवालाचे स्वागत केले आहे़
पुरातन वास्तूंचा प्रश्न सुटला
By admin | Published: April 03, 2015 2:29 AM