- डॉ. बंदिता सिन्हा, स्त्रीरोगतज्ज्ञमासिक पाळीच्या काळात महिलांना वेदना सहन कराव्या लागत असल्याने पहिल्या दिवशी महिलांना सुट्टी द्यावी, अशी मागणी करीत शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतच्या ठरावाची सूचना पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडावी, असे निवेदन सादर केले आहे. या निमित्ताने महिलांच्या संवेदनशील समस्येबाबतचा ऊहापोह.ज्यासमाजात ‘मासिक पाळी’ हा शब्द उच्चारणे म्हणजेदेखील गुन्हा ठरत असे, त्या समाजात आता ‘मासिक पाळी’च्या पहिल्या दिवशी रजा देण्यावर विचार-विनिमय होतोय, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. उशिराने का होईना, पाळीकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलतेय, हे लक्षात घेतले पाहिजे. या सर्वांचा ऊहापोह मांडताना, शास्त्रीयदृष्ट्या मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास समजून घेतला पाहिजे. त्यानंतर, सर्व क्षेत्रांत काम करणाऱ्या यंत्रणांना ‘पीरियड लिव्ह’चे महत्त्व लक्षात येईल.पाळीच्या सुरुवातीला कधी-कधी संप्रेरकांमधील बदलांमुळे पाळी येते. मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, पहिली दोन वर्षे ती अनियमितपणे येण्याची शक्यता असते. या काळात तीस दिवसांऐवजी चाळीस किंवा साठ दिवसांनी पाळी आली, तरी लगेच मुलींनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पाळीच्या चक्राची घडी नीट बसण्यासाठी थोडा वेळ लागतो. अनेक स्त्रियांना पाळी सुरू होण्याआधी सात ते दहा दिवस वेगवेगळ््या प्रकारचा त्रास होतो. चिडखोरपणा, थकवा, वारंवार लघवीला लागणे, डोकेदुखी, पोटात कळ, बद्धकोष्ठ, छाती-स्तन दाटून येणे, पायावर सूज यापैकी एक वा अनेक प्रकारचे त्रास होतात. यातला बहुतेक त्रास शरीरात या काळात पाणी व क्षार जास्त साठल्यामुळे होतात. म्हणून पाणी व मिठाचे प्रमाण कमी केल्यास बरे वाटते. मात्र, एवढ्याने भागत नसल्यास, डॉक्टरचा सल्ला घ्यावा. काही स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या आधी तीन-चार दिवस ओटीपोट, कंबर दुखण्याचा त्रास होतो, तो रक्तस्त्राव सुरू झाल्यावर थांबतो. या त्रासाचे मुख्य कारण म्हणजे ओटीपोटात काहीतरी आजार असणे. रोगनिदानासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. काहींना पाळी सुरू होताच ओटीपोटात दुखून येते. हे दुखणे थोडा वेळ टिकून, थांबून थांबून येते. पाळीच्या तीन-चार दिवसांत हा त्रास चालूच राहतो. अशा प्रकारचे दुखणे बऱ्याच वेळा आढळून येते. ते बहुधा पाळी सुरू झाल्यानंतर दोन-तीन वर्षांनी सुरू होते. असे दुखणे एका बाळंतपणानंतर पूर्ण थांबते.किंबहुना, मानसिक दुर्बलता, प्रचंड मानसिक ताण-दडपण या साऱ्यांच्या परिणामस्वरूप हा त्रास उद्भवतो व वाढतो. गर्भाशयामध्ये प्रोस्टॅगलँडइन नावाचे स्राव मासिक पाळीच्या वेळी निर्माण होतात. गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचन पावण्याची प्रेरणा यामुळे मिळते. त्यामुळेच तर गर्भाशयातील वाढलेला स्तर गर्भाशय मुख व योनीमार्गातून बाहेर फेकून देण्यास मदत होते. रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावल्यामुळे, गर्भाशयाच्या स्नायूस रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो, म्हणून या वेदना अनुभवास येतात. वैद्यकीय कारणमीमांसा समजून घेतल्यावर, हा सर्व त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.पाश्चिमात्य देशातही विटाळ१९व्या शतकात फ्रान्समध्ये वाइन तयार केल्या जात असलेल्या ठिकाणाहून स्त्रियांना विटाळाच्या कारणावरून बाहेर काढले जात असे. वाइन बनविण्यासाठी तिथे द्राक्षे तुडवली जात असताना, स्त्रियांच्या विटाळामुळे वाइन चांगली बनेल की नाही? याबाबत तेथील लोक साशंक असल्याने, त्यांनी तिथे काम करणाऱ्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात प्रवेश बंदी घातली. याच देशात रेशीम तयार करण्याच्या कारखान्यांमध्येही स्त्रियांना वाईट वागणूक मिळत होती. विटाळ असलेल्या स्त्रीने जर रेशीम किडा झाडापासून वेगळा केला, तर तो मरून जातो, असे कारण सांगून, स्त्रियांची हकालपट्टी केली. साखर कारखान्यांमध्येसुद्धा महिलांवर प्रवेशबंदी लादण्यात आली.लपवाछपवी नकोया शरीरधर्माबाबत सर्वांनी खुलेपणाने बोलणे गरजेचे आहे. यात कोणतीही लपवाछपवी नसावी. ही एक नैसर्गिक क्रिया आहे, हे लक्षात आले की, गैरसमजुती आपोपाप दूर होतील.बंधनांचे समर्थनअनेक ठिकाणी स्त्रियांनी स्वत:वर आणि इतर स्त्रियांवर बंधने लादली. त्यांनी या विरोधात बंड करण्याऐवजी बंधनांचे समर्थनच केले. मासिक पाळीबाबत शाळेपासूनच योग्य वयात शास्त्रोक्त शिक्षण देणे गरजेचे आहे. मानसिक ताण नक्कीच कमी होईलपुरुष मंडळी स्त्रिला होणारी वेदना शेअर करू शकत नाहीत, परंतु तिच्यासाठी त्यांच्यामध्ये तिच्या त्रासाबाबत सहवेदना असावी. तिला शारीरिक त्रास होईल, अशी कामे लावू नयेत. तिची कामे शेअर करावीत, त्यामुळे तिचा शारीरिक त्रास कमी होणार नाही, परंंतु तिचा मानसिक ताण नक्कीच कमी होईल. भरपगारी रजा मिळाली तर चांगलेच!मासिक पाळीच्या काळात एक दिवस स्त्रियांना भर पगारी रजा मिळाली, तर चांगलेच आहे, परंतु कोणीही त्याचा गैरवापर करू नये, म्हणून यावर लक्ष ठेवणारी प्रणाली कार्यालयांमध्ये असावी. विशेष म्हणजे, एखाद्या कार्यालयातील स्त्रिया मासिक पाळीच्या काळात जर रजेवर जाणार असतील, तर त्या दिवशीचे त्यांचे काम कोण करणार? यावरही तोडगा निघायला हवा. या मुद्द्याचे कोणत्याही माहिलेने भांडवल करू नये, यासाठी योग्य प्रणाली अस्तित्वात असावी. मासिक पाळीबाबत न्यूनगंड बु्रनो बेटरल्हेम्स याने मासिक पाळीबाबत पुरुषांच्या मानसिकतेवर बरेच संशोधन करून असे सांगितले आहे की, स्त्रीला निसर्गाने दिलेल्या संतती जन्माला घालण्याच्या देणगीमुळे पुरुष हा स्त्रीवर जळतो. त्याच्या मनात स्त्रीकडील या शक्तीबाबत एक सुप्त राग आहे. म्हणून तो तिच्यावर वर्चस्व गाजवू पाहतो. मासिक पाळीचा संतती जन्माशी संबध असल्याने त्याच्यात रोषाची भावना निर्माण झाली. यामुळे स्त्रियांमध्ये न्यूनगंड निर्माण झाला आहे. - शब्दांकन : स्नेहा मोरे
प्रश्न ‘मासिक’ रजेचा
By admin | Published: July 16, 2017 12:16 AM