शहाजी फुरडे-पाटील/ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 3 - पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून भक्तगण दर्शनासाठी पंढरीत पोहचले असून, विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू असले तरी दर्शनरांग रविवारी रात्री गोपाळपुरच्या पुढे इंनजिनिअरिंग कॉलेजपर्यंत पोहचण्यास सुरुवात झाली आहे. मंदिरात अचानक दुरुस्तीचे काम काढल्यामुळे पत्रा शेड मधील लाईन तब्बल पाच ते सहा तास झाले पुढे न सरकल्याने दर्शनरांगेतील भाविकानी वैतागुन रात्री बाराच्या दरम्यान एकत्र येत प्रशानाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल रोष व्यक्त केला.मुळातच मंदिरात दर मिनिटाला केवळ 30 ते35 भाविकांचे दर्शन होत आहे, त्यामुळे लाईन लांब गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापूजेसाठी येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर आंदोलक त्यांच्या जवळ पोचवू नयेत म्हणून विठ्ठल मंदिरात प्रशासनाने अचानक वेल्डिंग चे काम काढल्यामुळे दर्शन रांग थांबली आहे. याचा परीणाम पत्रा शेड मधील भाविक वैतागले आहेत. लाईन जर पाच-सहा तास एकाच जाग्यावर थांबणार असेल तर आमचे दर्शन कधी होणार असा सवाल ते करीत आहेत. या बरोबरच या पत्रा शेड मध्ये भाविकांना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. यातील कांही भाविक हे पंधरा तास झाले लाईन मध्ये उभे आहेत, त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याची ही मोठी अडचण झाली आहे.या भाविकांनी रात्री बारा वाजता पत्रा शेडची जबाबदारी असलेल्या तहसीलदार संजय पाटील यांच्या समोर एकत्र येऊन आम्ही विठ्ठलासाठी आलो आहोत, आम्हाला मुख्यमंत्र्याचे काही देणे-घेणे नाही. त्यात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस बाहेर सोडत नाहीत आणि सोडलेच तर पुन्हा आत घेत नाहीत.रात्री सव्वा बारा वाजता आयपीएस अधिकारी निखिल पिंगळे यांनी पत्रा शेडला भेट देऊन भाविकांच्या भावना व अडचणी जाणून घेतल्या.
विठ्ठल मंदिरात पत्राशेड मधील रांग 6 तास थांबली, भाविकांमध्ये रोष
By admin | Published: July 03, 2017 1:30 AM