सावंतवाडी : सावंतवाडीतील रेल्वे टर्मिनसच्या कामाची गती मंदावली आहे. कोकण रेल्वेचे नूतन संचालक संजय गुप्ता यांनी मळगाव व झाराप या दोन रेल्वे स्थानकांना सोमवारी भेट देऊन पाहणी करून गती वाढवण्याची सूचना केली. झाराप येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.संजय गुप्ता यांनी सोमवारी एक दिवसाचा सिंधुदुर्ग दौरा केला. यावेळी त्यांनी टर्मिनसला भेट देऊन येथील कामाची माहिती घेतली. त्यांच्यासोबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापक बी. बी. निकम उपस्थित होते. संजय गुप्ता यांनी एक महिन्यापूर्वी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सोमवारी प्रथमच कोकण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या मंदावलेल्या कामाबाबत गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत टर्मिनसच्या कामानंतर होणाऱ्या इमारती तसेच रेल्वे रूळ वाढवण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. झाराप रेल्वे स्थानकाला भेट दिल्यानंतर त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले असून, भाविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, याची दक्षता घ्या, असे अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच रेल्वे प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्यासह इतर सोयींबाबतही त्यांनी माहिती घेतली.दरम्यान, सावंतवाडी टर्मिनसचा प्रलंबित असलेला आणि मंदगतीने सुरु असलेल्या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. (प्रतिनिधी)वसई - सावंतवाडी : वेळापत्रक अद्याप निश्चित नाहीवसई ते सावंतवाडी नवीन रेल्वे धावणारकोकण रेल्वेत वारंवार होणारी गर्दी पाहून आता पश्चिम रेल्वे वसईरोड ते सावंतवाडी अशी नव्याने रेल्वे सुरू करणार आहे. याबाबतची मागणी प्रवाशांबरोबरच केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार ही रेल्वे सुरू करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. रेल्वेचे याबाबत अद्यापपर्र्यंत वेळापत्रक निश्चित झाले नसले तरी रेल्वे सुरू करण्यावर पश्चिम रेल्वे ठाम आहे.रेल्वेला सुगीचेदिवसरेल्वेमंत्री म्हणून सुरेश प्रभू यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण रेल्वेला सुगीचे दिवस आले आहेत. सावंतवाडी टर्मिनसचे काम सुरू झाले तसेच कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच डबल डेकर रेल्वे सुरू करण्यात आली आहे. पर्यटन रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दिवाळी व गणेश चतुर्थी स्पेशल या गाड्या नेहमी रेल्वे मार्गावर धावत असतातच, त्यातच आता नव्या रेल्वे गाडीची भर पडणार आहे.लवकरच वेळापत्रक जाहीर करणार : तेलगूयाबाबत कोकण रेल्वेचे प्रसिध्दीप्रमुख सिध्देश्वर तेलगू यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रवाशांची मोठी मागणी असल्याने तसेच केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीसुध्दा मागणी केली होती. त्यामुळेच वसईरोड ते सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यात येणार असून, लवकरच आम्ही रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
टर्मिनसचे काम जलद करा
By admin | Published: December 15, 2015 9:46 PM