ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - राज्य शासनातर्फे देण्यात येणारा २०१५ वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रा. रा. ग. जाधव यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे.
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली आहे. मराठी भाषा गौरवदिनी म्हणजेच येत्या २७ फेब्रुवारी रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येण्याची शक्यता आहे
.
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास २०१० या वर्षापासून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येत असून, २०१५ या वर्षासाठी ज्येष्ठ साहित्यीक प्रा. रा. ग. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने यापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक विजया राजाध्यक्ष, श्री. के. ज. पुरोहित, प्रा. द. मा. मिरासदार, श्री. ना. धों. महानोर, वसंत आबाजी डहाके यांना गौरविण्यात आले आहे.
प्रा. रा. ग. जाधव यांच्याविषयी -
मराठीतील समीक्षक व लेखक
औरंगाबाद येथील २००४ सालातल्या ७७ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहेत.
३७ काव्यसंग्रहाचे त्यांनी परिक्षण लिहीले आहे.
१८५० ते २००० काळातील मराठी नवकवितांवरील प्रयोग ह्यावर परिसंवाद.
रा.ग. जाधव यांचे प्रकाशित साहित्य
आनंदाचा डोह
काव्यसमीक्षेतील धुळाक्षरे
खेळीमेळी (ललित) (प्रकाशन वर्ष २००८)
नववाङ्मयीन प्रवृती व प्रमेये
निवडक समीक्षा
निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी
पंचवटी
प्र. के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
माझे चिंतन
वागर्थ
वाङ्मयीन निबंध लेखन
वाङ्मयीन परिप्रेक्ष्य
वासंतिक पर्व (ललित) (प्रकाशन वर्ष २००९)
विचारशिल्प
संध्यासमयीच्या गुजगोष्टी(निवडक लेखांचे पुस्तक) (साधना प्रकाशन)(प्रकाशन वर्ष २०१३)
समीक्षेतील अवतरणे
साठोत्तरी मराठी कविता व कवी
साहित्य व सामाजिक संदर्भ
साहित्याचे परिस्थितीविज्ञान