विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई : राज्यातील ६,७४२ नर्सिंग होममध्ये विविध कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाले असून, ६८ नर्सिंग होम बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्यातील १५ बोगस डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.हा विषय गंभीर असून, बोगस नर्सिंग होमला आळा घालण्यासाठी लवकरच ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ तयार केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.राज्यातील बेकायदेशीर नर्सिंग होमबाबत विजय गिरकर, रामनिवास सिंह, सुजितसिंह ठाकूर, शरद रणपिसे यांनी तारांकित प्रश्न मांडला.बोगस नर्सिंग होममध्ये रुग्णांच्या जिवाचे हाल होतात. राज्यातील एकूण ७,६४२ नर्सिंग होमपैकी ६,७४२ नर्सिंग होम्समध्ये विविध कायद्यातीलतरतुदीच्या पालनात अनियमितता आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. नर्सिंग होमबाबत १९५०चेच कायदे आहेत. यात सुसूत्रताआणण्याची आवश्यकता असून, त्यासाठी क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट आणण्याची प्रक्रीया सुरू असल्याचे सावंत यांनी सांगितले....अन् प्रश्न भाजपावरच उलटलानर्सिंग होमवर जिल्हाधिकाºयांची समिती कारवाई करेल, असे उत्तर आरोग्यमंत्री देत आहेत. मग आरोग्य खात्याने कायदे का बनविले नाहीत? अशी विचारणा करत, भाजपा सदस्य भाई गिरकर यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावर आरोग्य खात्याकडे कारवाईचा अधिकारच नाही, हा अधिकार वैद्यकीय शिक्षण विभागाला असल्याचा खुलासा सावंत यांनी केला.
राज्यात ६८ नर्सिंग होम बोगस आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 3:48 AM