शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

ऐरोली मतदारसंघात युतीमध्येच रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:10 PM

आघाडीमध्ये उमेदवाराचा शोध : विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे बदलली समीकरणे

- नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिलेल्या ऐरोली मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली आहेत. शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच असून युतीच्या निर्णयावरच येथील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. युतीमध्ये चुरस असताना काँगे्रस व राष्ट्रवादी मात्र सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर मतदारसंघाचे विभाजन होऊन २००९ मध्ये ऐरोली मतदारसंघाची निर्मिती झाली. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या तिकिटावर संदीप नाईक या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. गत पाच वर्षांमध्ये सातत्याने या मतदारसंघातील समीकरणे बदलत राहिली आहेत. २०१५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली. भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवकही या मतदारसंघात निवडून आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद देऊन कामगार वर्गाला भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यानंतर कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधान परिषदेचे सदस्यपद देण्यात आले. शिवसेनेचे विजय चौगुले यांना वराड समाज समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या राजन विचारे यांना या मतदारसंघातून जवळपास ४४ हजार मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदार संदीप नाईक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मतदारसंघातील सर्व समीकरणेच बदलून गेली आहेत.नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस आहे. विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, माजी मंत्री गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितीही वाढली आहे. परंतु त्या तुलनेमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांमध्ये फारशी चुरस दिसत नाही. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आता फक्त दोन नगरसेवक उरले आहेत.

यामुळे राष्ट्रवादीला उमेदवार आयात करण्याची वेळ आली आहे. आघाडी झाल्यास हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने काँग्रेसने अद्याप फारशी मोर्चेबांधणी सुरू केलेली नाही. युती होणार की नाही यावरच पुढील गणिते अवलंबून आहेत. युती झाली तर हा मतदारसंघ भाजपकडे जाऊन संदीप नाईक उमेदवार असतील. युती झाली नाही तर शिवसेनेकडून महापालिकेमधील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेवक एम. के. मढवी यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसच्या रमाकांत म्हात्रे यांचेही नाव चर्चेत आहे.राजकीय उलथापालथऐरोली मतदारसंघात पाच वर्षे सातत्याने राजकीय बदल घडत आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपची फारशी संघटनात्मक बांधणी या मतदारसंघात नव्हती. पक्षाचे फक्त दोन नगरसेवक होते. परंतु सद्यस्थितीमध्ये विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आहेत. भाजपचे विधान परिषद सदस्य रमेश पाटील याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. शिवसेनेचीही संघटनात्मक ताकद या मतदारसंघात आहे. यामुळे युतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विद्यमान आमदार व पदाधिकारी भाजपत गेल्यामुळे राष्ट्रवादीची स्थिती बिकट झाली आहे. सद्यस्थितीमध्ये दोन नगरसेवक एवढीच त्यांची ताकद असून काँगे्रसचे या मतदारसंघात ३ नगरसेवक आहेत. दहा वर्षे या मतदारसंघात आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसला सक्षम उमेदवार शोधावा लागत आहे.मागोवा मागील निवडणुकीचाऐरोली मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार संदीप नाईक यांना ७६,४४४ मते मिळाली होती. शिवसेनेचे विजय चौगुले यांना ६७ हजार ७१९ मते मिळाली व भाजपचे उमेदवार वैभव नाईक यांना ४६ हजार ४०५ मते मिळाली होती. ८७२५ मतांनी संदीप नाईक विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना या मतदारसंघातून ४४ हजार मतांची आघाडी मिळाली आहे.