मुंबई : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्ध्वस्त झालेले शेतकरी देशभर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट संबोधून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतक-यांचा अवमान केला आहे. त्यांनी शेतकºयांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा नेत्यांची शेतकºयांबाबतची हीन मानसिकता दर्शविणारे हे विधान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत शेतकºयांना दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्यांमध्ये ४१.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत ४४ हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात १५ हजारांपेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. ३५ पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यूपीए सरकारच्या काळात ४.२ टक्के असणारा कृषी विकासदर आता १.९ टक्के झाला. त्याचे उत्तरही कृषिमंत्र्यांनी द्यावे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.
राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:07 PM