शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 01:55 PM2019-03-14T13:55:03+5:302019-03-14T13:55:39+5:30

विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Radhakrishna Vikhe-Patil criticize Sharad Pawar's comments on Balasaheb Vikhe | शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

शरद पवारांच्या मनात बाळासाहेब विखेंबाबत द्वेष, राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

googlenewsNext

मुंबई - विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबाबत वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले. 

सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांनी विखे-पाटील कुटुंबासोबतच्या वादावरून केलेल्या टिप्पणीवरून विखे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की,  शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे. मात्र त्यांच्यासाऱख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे''

काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते की, ''यापूर्वी विखे घराण्यातील बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदासंघातून पराभूत केलेले आहे. हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यावेळी विखे यांनी माझ्याविरोधात खटलाही भरला होता. मी निवडणुकीतून अपात्र होईल, अशी वेळ माझ्यावर आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात मला दिलासा मिळाला. त्यामुळे विखे यांना कुणी पराभूत करू शकत नाही, असे नाही.'' 
 

Web Title: Radhakrishna Vikhe-Patil criticize Sharad Pawar's comments on Balasaheb Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.