स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांची थोरातांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:32 AM2023-02-08T10:32:56+5:302023-02-08T10:33:25+5:30

सोयीप्रमाणे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांनी खरी परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे विनाकारण लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणे योग्य नाही, अशीही टीका विखे पाटील यांनी केली.

radhakrishna vikhe patil criticized congress leader balasaheb thorat over resignation raw | स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांची थोरातांवर घणाघाती टीका

स्वत:ला बाजीप्रभू देशपांडे म्हणवून घेणारे खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांची थोरातांवर घणाघाती टीका

googlenewsNext

मुंबई :  २०१९ साली काँग्रेस वाचविण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले ? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी उपरोधिक आणि घणाघाती टीका करीत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर  माध्यम प्रतिनिधींनीकडून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणूक निकालानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्यातील या घडामोडींबद्दल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात, त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. नाशिक पदवीधर मतदारसंघात महविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पण काँग्रेसने महविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. असे विखे-पाटील म्हणाले.

विखे-पाटील म्हणाले की, ज्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघात मविआचा प्रचार करायचा होता, त्यावेळी तुम्ही आजारी होता. निवडणूक संपल्यानंतर तुम्ही व्हीसीवर भूमिका स्पष्ट करायला लागलात. मग निवडणुकीत देखील व्हीसीवर प्रचार करु शकला असता. सोयीप्रमाणे राजकारण करण्याचे दिवस आता संपले आहेत. लोकांनी खरी परिस्थिती माहीत आहे. त्यामुळे विनाकारण लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणे योग्य नाही, अशी टीका विखे पाटील यांनी केली. याचबरोबर, काँग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जाऊन भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील त्यांच्याकडे जाऊन भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे. त्याची जबाबदारी ते घेणार की नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे, असे विखे-पाटील यांनी म्हटले.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींकडे विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा मंगळवारी जोरदार रंगली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी बाळासाहेब थोरात यांना एकटे खिंड लढविलेले बाजीप्रभू म्हटले गेले होते. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ४४ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांचे दिल्लीच्या वर्तुळातील राजकीय वजन वाढले होते. महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. हे अन्य काँग्रेस नेत्यांना असुरक्षित वाटले. त्यामुळे थोरात विरोधी गटाकडून आता सत्यजित तांबे यांच्यानिमित्ताने त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. 
 

Web Title: radhakrishna vikhe patil criticized congress leader balasaheb thorat over resignation raw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.