- शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला हजेरी : वीज पडून राज्यात तिघांचा मृत्यू
मुंबई : दुसऱ्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला शनिवारी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पिठोरी अमावास्येच्या मुहूर्तावर स्नानासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांना रामघाटावर जाण्यास मनाई करण्यात आली होती. अकोला व जळगावमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. खान्देशात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, लातूरमध्ये पाऊस झाला. नांदेड, परभणीत गारपीट झाली. पुण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यातही पाऊस झाला. नाशिकमध्ये पूर्वा नक्षत्राच्या अंतिम चरणात पावसाने दीड तास ठाण मांडला होता. अनेक घरांसह तपोवनातील साधुग्राममध्येही अनेक खालशांच्या तंबूंमध्ये पाणी घुसले. अंगावर वीज पडल्याने अकोला जिल्ह्यातील दीपक कमलाकर भांडे, साकिब शेख कासम व जळगाव जिल्ह्यातील दिनेश वासुदेव महाजन यांचा मृत्यू झाला तर सात जखमी झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पर्वणीवर सावटनाशिक व त्र्यंबकेश्वर येथे रविवारी होणाऱ्या दुसऱ्या महापर्वणीवर पावसाचे सावट असल्याने प्रशासन सतर्क आहे.