डिप्पी वांकाणी, मुंबईशीना बोरा हत्याकांड प्रकरणात राहुल-इंद्राणी-पीटर-विधी यांच्यात ई-मेलस्ची झालेली देवाणघेवाण हे महत्वाचे पुरावे असल्यामुळे केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) राहुल आणि विधीला साक्षीदार बनविले आहे. शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल याने शीना गुढरित्या बेपत्ता (२०१२) झाल्यापासून इंद्राणीला अटक होईपर्यंत शीनाबद्दल विचारणा केल्याचा एकही ई-मेल न आढळल्याने मिखाईलला साक्षीदार बनविण्यात आले नाही, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सागितले.मिखाईल आणि इंद्राणी यांच्यात जी अनेक ई-मेल्सची देवाणघेवाण झाली त्यात मिखाईल एकतर इंद्राणीकडे पैसे मागताना किंवा तिला दूषणे देताना दिसतो. इंद्राणीला मिखाईलने २७ मे २०१४ रोजी पाठविलेल्या ई-मेलमध्ये त्याने त्याच्या कारचे इंजिन कसे खराब झाले आणि कारशिवाय इंद्राणीच्या पालकांना फिरविणे कसे अवघड आहे, हे सांगितले. २४ जानेवारी २०१३ रोजीच्या ई-मेलमध्ये मिखाईलने इंद्राणीला मी ट्यूशन लावल्यामुळे दरमहा जास्तीचे सहा हजार रुपये पाठव, असे म्हटले होते. इंद्राणीला पाठविलेल्या ई-मेल किंवा मेसेजमध्ये त्याने शीनाबद्दल विचारणा केल्याचे आढळले नाही. त्याने एका ई-मेलमध्ये शीना ज्या अपार्टमेंटमध्ये राहुलसोबत राहत होती, त्याचा करार संपविण्यासाठी कागदपत्रे पाठविण्यासाठी सांगितले होते, असे हा अधिकारी म्हणाला. तथापि, दोन मेसेजेसमध्ये मिखाईलने इंद्राणीला तिच्या तीन लग्नांबद्दल आणि तिचे हे रहस्य कसे जाहीर होईल, याबद्दल छेडले होते. इंद्राणी तिच्या आईवडिलांच्या आरोग्याकडे कसे दुर्लक्ष करीत आहे याबद्दल मिखाईने ई-मेलमध्ये वाईट भाषा वापरली होती.मेसेजेसद्वारे झालेली देवाणघेवाणतू माझी आई आहेस, तू मला जन्म दिलास. परंतु आज मी असे म्हणतो की तू...असून तीनवेळा लग्न केलेस. तुझा अंत जवळ आला आहे. आणखी एक म्हणजे मी तुझा प्रचंड द्वेष करतो. जगाला तुझे रहस्य लवकरच समजेल. तू मीडिया व्यवसायात असून त्याचा उपयोग आपण करू. ....तसे वागणे थांबव. तू म्हातारी होत आहे. देव बघत असून तुला आता हिशेब चुकता करावा लागणार आहे. पैसा तुला तरूण ठेवू शकत नाही हे जाणून घे. तू असहाय म्हातारी होणार आहेस. तुझ्या सगळ््या वेगवेगळ््या कल्पनांची माती होऊन तू माझ्याकडे भीक मागशील, तीच तुझी नियती असेल. सावध राहा. तुझा काळ जवळ आला आहे. तू पळून जाऊ शकत नाहीस. आता तरी खूप उशीर व्हायच्या आधी समजून घेशील, अशी आशा आहे.७/८/१२मेलानी (शीना राहत असलेल्या अंधेरी येथील अपार्टमेंटच्या मालक) मला आता शीनाशी बोलायचे आहे, असे मला म्हणतात. कारण शीनाबद्दल पोलीस चौकशी करीत आहेत. कृपया याकडे लक्ष दे.२४/१/२०१३मम्मी, मी आज गणित आणि भौतिकशास्त्राची ट्यूशन सुरू केली. प्रत्येक विषयासाठी मला तीन हजार रुपये द्यावे लागत असल्यामुळे पुढील महिन्यापासून तू मला कृपया जास्तीचे सहा हजार रुपये पाठव.२७/५/२०१४ पावसामुळे पुराचे पाणी कारच्या इंजिनमध्ये शिरले. मेकॅनिककडे मी गेल्यानंतर त्याने इंजिन पूर्णपणे खराब झाल्यामुळे ते दुरुस्त होऊ शकत नाही, असे सांगितले आहे. आता माझ्याकडे कारच नाही. मी काय करावे हे कृपया सांग.१५/५/२०१५हाय मम्मी, कृपया एका गोष्टीचा विचार कर. मी तुझा मुलगा आहे. तू मला जन्म दिलास. मम्मी कृपया मला फोन कर, मला तुझ्याशी बोलायचे आहे. मी तुझा मुलगा आहे, कोणी तिऱ्हाईत नाही.
ई-मेल्सच्या आधारे राहुल, विधी बनले साक्षीदार
By admin | Published: November 25, 2015 3:29 AM