रेल्वे प्रवासाचा होता विचार : नियोजन कोलमडले असतेनागपूर : अमरावती जिल्ह्णात आयोजित किसान पदयात्रेत सहभागी होण्यासाठी अ.भा.काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नागपुरातून कारने जायचे की रेल्वेने हे गुरुवारी पहाटे ४ पर्यंत निश्चित नव्हते. सकाळच्या रेल्वेने धामणागाव पर्यंत जाता येईल का, याची चाचपणी बुधवारी करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी नियोजित वेळापत्रक कोलमडू नये म्हणून प्रवासातील बदल टाळण्यात आला व राहुल गांधी हे कारनेच अमरावतीसाठी रवाना झाले. ऐनवेळी राहुल गांधी हे पहाटे ५.४० ची नागपूर-भुसावळ पॅसेंजर किंवा सकाळी ६.३६ ला सुटणारी जबलपूर-अमरावती एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांपैकी एकाने धामणगावपर्यंत जाऊ शकतात, अशी शक्यता काँग्रेस पदाधिकारी वर्तवित होते. याशिवाय सेवाग्राम येथे सकाळी रेल्वे पोहचून बापुकुटीचे दर्शन घ्यायचे व नंतर पुढील प्रवास सुरू करायचा, असाही विचार पुढे आला होता. असे झाले तर राहुल यांचा विदर्भातील प्रवास रेल्वे, कार व पायी असा तिन्ही प्रकारे होईल. तीन वेगवेगळ्या प्रवासातून वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधता येईल व तो जास्त परिणामकारक असेल, असा विचार काही काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. मात्र, अमरावती जिल्ह्णातील ज्या गावांना व शेतकरी कुटुंबांना राहुल गांधी भेट देणार आहेत तेथे दोन दिवसांपूर्वीच वेळेसह निरोप देण्यात आले आहेत. धामणगावपर्यंत रेल्वेने प्रवास केला तर पुढचे वेळापत्रक कोलमडेल. शिवाय अमरावती मार्गावर रस्त्यात काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताची तयारी करून ठेवली होती. तसे निरोप ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविले होते. अशात ऐनवेळी कार प्रवास रद्द करून रेल्वे प्रवास केला तर संबंधित कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा हिरमोड होईल व यातून चांगले संकेत जाणार नाहीत, असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. शिवाय ऐनवेळी दौऱ्यात बदल केला तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळे शेवटी रेल्वे प्रवास टाळून नियोजित कार्यक्रमानुसार कारनेच जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी रणरणत्या उन्हात अमरावतीतील गुंजी ते रामगावपर्यंत १५ किमीची पदयात्रा करून आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. तेथील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी चर्चा केली. ह्यकर्जाच्या ओज्याने पिचलेले अनेक शेतकरी आत्महत्या करत असताना काही मंत्री मात्र तीनच शेतक-यांनी आत्महत्या केल्याचा दावा करतात तर काही जण त्या शेतक-यांची भेकड म्हणून अवहलेना करतातह्ण असे सांगत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत असताना राज्य व केंद्र सरकार मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार शेतकरी वा मजुरांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. (प्रतिनिधी)
ऐनवेळी बदलला राहुल यांनी प्लान
By admin | Published: May 01, 2015 2:08 AM