सोलापूर : लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे दोघे बुधवारी (दि़ १३) सोलापुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी (दि़ १३) सोलापुरात येणार असल्याचा निरोप काँग्रेस कार्यालयास मिळाला आहे. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही असणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा झाली होती. दरम्यान, याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी रोजी सभा घेऊन काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना लक्ष्य केलं होतं. निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी स्थानिक प्रश्नांना हात घातल्याने चांगलाच प्रभाव झाल्याचे दिसून आल्याने यावेळेस काँग्रेसतर्फे मोठी तयारी करण्यात येत आहे. तसेच गेल्या महिन्यात मोदी यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होता. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापूरच्या राजकारणात लक्ष घातल्यामुळे लोकसभेची चुरस आतापासूनच दिसू लागली आहे.सोशल मीडियावर लक्षमोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोशल मीडियावर भर देण्याचा निर्णय गुरुवारी काँग्रेसभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची बैठक निरीक्षक अनिकेत परब,संकेत परब यांच्या उपस्थितीत झाली. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका सोशल मीडियाच्या वापराद्वारे यशस्वी झाल्या. याचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले.
राहुल गांधी, पवार १३ तारखेला सोलापुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 6:34 AM