वज्रेश्वरी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची शुक्रवारी सुनावणी होती. मात्र, ते गैरहजर राहिल्याने त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील नारायण अय्यर उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. राहुल यांचे वकील अशोक मुदगीर, नारायण अय्यर, तरन्नुम चिमा यांनी न्यायालयात बाजू मांडली. केवळ वृत्तपत्रांच्या कात्रणावरून याचिका दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे कायदेशीरपणे गुन्ह्याचे स्वरूप उघड होत नसल्याने संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध करावीत, अशी मागणी करण्यात आली होती. आरोपी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ३ मार्चला ठेवली होती. (वार्ताहर)>फिर्यादी पक्षाने कागदपत्रेच दिली नाहीत३० जानेवारीला राहुल यांच्यावर आरोपनिश्चितीसाठी लागणारी कागदपत्रे फिर्यादी पक्षाने सादर न केल्याने न्यायालयाने दाव्यातील कागदपत्रे सादर करावीत, अशी सूचना करत पुढील सुनावणी ३ मार्चला ठेवली होती. मात्र, उ.प्र. निवडणुकीत व्यस्त असल्याने राहुल न्यायालयात उपस्थित राहू शकले नसल्याचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले.
राहुल गांधी सुनावणीसाठी गैरहजर
By admin | Published: March 04, 2017 5:39 AM