शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
4
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून खास शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
5
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
6
Ganesh Visarjan 2024 Live: गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
7
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
8
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
9
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
10
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
11
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
12
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
13
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
14
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
15
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
16
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य...
19
Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट
20
टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात

"राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 2:55 PM

Eknath Shinde : आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद भारताच्या राजकारणात उमटले आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला असून आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, विदेशात जाऊन सातत्याने भारताची येथील नागरिकांची बदनामी करण्याचा उद्योग विरोधी पक्षनेते, लोकप्रतिनिधी राहुल गांधी करतात. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र बोलताना त्यांनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला. आरक्षण संपवण्याचा मनसुबा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करणारे राहुल गांधी यांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. 

शिवसेना व महायुतीतील सहकारी पक्ष आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि आरक्षण संपवू देणार नाही, याची ग्वाही पुन्हा या निमित्ताने देत आहोत. आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आपला भारत देश ही 'फेअर प्लेस' नाही, असे परदेशात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसमोर बोलणं हे भारतातील नागरिकांसाठी अत्यंत अवमानकारक आहे. राहुल गांधी हे परकीय मानसिकतेलाच धार्जिणे आहेत, हे या निमित्ताने सिद्ध होते, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, अनेक सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपल्या बुद्धितेजाने लोकांची मने जिंकली आहेत. स्वामी विवेकानंदांपासून ते आजच्या आयटी क्षेत्रातील बुद्धिमंत विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत भारताचा ध्वज उंचावला आहे. त्या सगळ्यांचा अवमान राहुल गांधी यांनी केला आहे. देशाचा, आमच्या अस्मितांचा आणि नागरिकांचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही आणि मान्यही होणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असेही एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधात -फडणवीस राहुल गांधीचा खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधात आहेत. त्यांचं वक्तव्य निंदनीय आहे, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरक्षणाच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?दरम्यान, जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण या दोन मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मागच्या काही दिवसांपासून कमालीचे आक्रमक आहेत. दरम्यान, सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार? या एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोठं विधान केलं आहे. जेव्हा भारतात आरक्षणाच्या दृष्टीने समानता असेल, तेव्हाच काँग्रेस पक्ष देशामधील आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विचार करेल. सध्यातरी अशी स्थिती नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीEknath Shindeएकनाथ शिंदे