शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
5
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
6
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
7
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
8
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
9
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
10
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
11
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
12
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
13
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
14
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
15
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
16
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
17
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
18
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
19
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका

FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 7:57 PM

"समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? "

Rahul Gandhi on Badlapur Crime News : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या अत्याचारानंतर सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरमधील हजारो नागरिक संतप्त झाले आणि अनेक तास बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केले. याशिवाय, राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होतो. दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

बदलापूरमधील लैंगिक शोषणाच्या घटनेबाबत राहुल गांधी यांनी सोशल मीडियाव पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लज्जास्पद गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरातील दोन चिमुकलींवर घडलेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागले. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? पीडितांना पोलिस ठाण्यात जाणेही इतके अवघड का झाले आहे?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राहुल पुढे म्हणतात, "न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने फक्त पीडित हतबल होत नाहीत, तर गुन्हेगारांना अभय मिळते. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही," असेही राहुल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

शाळेत काय घडले?बदलापुरातील एका विद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे(24) याने अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक वाम झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. 

आरोपीला फाशी देण्याची मागणीआंदोलकांशी चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस आयुक आशुतोष डुब्बरे यांनीही धाव घेतली. मात्र, त्यांनाही फारसे यश आले नाही. मंत्री बोलत असताना फाशी. फाशी.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्याचाराचे खटले फास्ट ट्राकवर चालविण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, याचे आश्वासन महाजन व शिनगारे देत होते. मात्र, आंदोलक जस्टिस जस्टिस…अशा घोषणा देत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी तब्बल ताराभर आंदोलकांशी चर्चा केली. ते आंदोलकांना वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकत नव्हते. लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार करावा लागला. 

पीडित कुटुंबाचं राज ठाकरेंना पत्र अन् मनसेमुळे बदलापूर प्रकरणाला वाचा फुटली, 'असा' होता घटनाक्रम

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीbadlapurबदलापूरcongressकाँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी