राहुल गांधी आज मराठवाड्यात, राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची राहणार उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:17 AM2017-09-08T04:17:36+5:302017-09-08T04:17:49+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी शुक्रवारी नांदेड आणि परभणी दौ-यावर येत आहेत. नांदेडमध्ये सकाळी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला त्यांची उपस्थिती राहील तर परभणीमध्ये दुपारी ते संघर्ष सभा घेणार आहेत.
नांदेड/परभणी : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहुल गांधी शुक्रवारी नांदेड आणि परभणी दौ-यावर येत आहेत. नांदेडमध्ये सकाळी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याला त्यांची उपस्थिती राहील तर परभणीमध्ये दुपारी ते संघर्ष सभा घेणार आहेत. यावेळी राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
नांदेडमध्ये नवा मोंढा मैदानावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता काँग्रेसचा विभागीय मेळावा होणार आहे. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खा. गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण तसेच मराठवाड्यातील पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या या मेळाव्याला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. ़ या मेळाव्यानंतर राहुल गांधी परभणीकडे रवाना होतील. त्यांचे दुपारी १२ च्या सुमारास पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आगमन होणार आहे़