ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला आणि सर्वसामान्यांना रांगेत उभं केलं. मात्र ज्यांच्याकडे हजारो कोटी रुपये पडले आहेत, अशी एकतरी व्यक्ती बँकेच्या रांगेत उभी दिसते का असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी विचारला. तुमच्या (लोकांच्या) खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींना देणार आहेत' असा आरोप करत राहुल यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयावर कडाडून टीका केली. भिवंडी येथील सभेत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील एका सभेदरम्यान महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात खटला सुरू होता. मात्र बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल यांना जामीन मंजूर केला असून या खटल्याची पुढील सुनावणी २८ जानेवारी रोजी होणार आहे. या निर्णयानंतर राहुल यांनी भिवंडी कोर्टाबाहेरच सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली.
' मी ही लढाई लढू शकतोय याचा मला खूप आनंद आहे. महात्मा गांधींच्या विचारांसाठी मी ही लढाई लढतोय. जी व्यक्ती कणखरपणे उभी राहू शकते, त्या व्यक्तीला कोणीच गुलाम बनवू सकत नाही, असे गांधीजी म्हणाले होते ' असे राहुल यांनी यावेळी सांगितले. 'पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पैसे बदलून घेण्यासाठी आठवड्याभरापासून नागरिक तासनतास बँकेच्या रांगेत उभे राहताना दिसत आहे. मात्र त्यामध्ये एकतरी श्रीमंत व्यक्ती दिसते का? असा सवाल राहुल यांनी विचारला. ' तुम्ही रांगेत उभे राहून त्रासलेले असताना मोदी कधी हसत आहेत, तर कधी रडत आहेत. सामान्य लोकांच्या खिशातून पैसे काढून या उद्योगपतींना दिले जातील, उद्योगपतींची कर्जे माफ करण्यासाठी सामान्य जनतेचे पैसे वापरले जाणार आहेत' अशी टीका त्यांनी केली.
Main bohut khush hoon aaj ki main ladh pa raha hoon aur inke saamne khada hoon: Rahul Gandhi in Bhiwandi pic.twitter.com/SPsVsuOkJ7— ANI (@ANI_news) 16 November 2016
Modi ji took the decision of #demonetisation; you are now standing in the queue; have you seen any rich people standing there?: Rahul Gandhi— ANI (@ANI_news) 16 November 2016