प्रा. नानासाहेब कांडलकर -
जळगाव जामोद (जि. बुलढाणा) : यात्रा महाराष्ट्राच्या सीमेवर पाेहाेचल्यानंतर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी दोन दिवस विश्रांती घेईल. राहुल गांधी सोमवार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी निमखेडीतून हेलिकॉप्टरने औरंगाबादला जातील. तेथून दिल्ली व नंतर गुजरातला निवडणुकीच्या प्रचाराकरिता जातील. यामुळे या परिसरात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरचे टेकऑफ हाेणार आहे. प्रचारानंतर ते पुन्हा निमखेडीत उतरतील. बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी यात्रा पुन्हा मध्य प्रदेशकडे प्रस्थान करेल. यात्रेचा मुक्काम पाच दिवस बुलढाण्यात असेल. एवढा प्रदीर्घ मुक्काम पूर्ण दौऱ्यात काेणत्याच एका जिल्ह्यात नव्हता हे विशेष. येथील निसर्गरम्य वातावरणात यात्रेकरुंच्या मुक्कामासाठी कॅम्प उभारला आहे. या कॅम्पमध्ये राहुल गांधी रविवारी रात्री मुक्काम केला.