मुंबई - महाराष्ट्र बाल हक्क आयोगाने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याचे प्रकरण देशभर गाजत आहे. या घटनेसंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटरवर भाष्य करून एक व्हिडिओही ट्विटरवर अपलोड केला होता. या घटनेसंबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. त्या आरोपींवर "पॉक्सो" अंतर्गत अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली आहे. परंतु या संदर्भात राहुल गांधी यांनी ट्विट करून पीडित मुलांचा व्हिडिओ अपलोड करुन बाल हक्क कायद्यानुसार उल्लंघन झाले आहे असे बाल हक्क आयोगाकडे आलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे.
बाल न्याय अधिनियम कायद्यातील "कलम 74" नुसार कुठल्याही पीडित बालकाचे फोटो, व्हिडिओ किंवा त्याचे नाव जाहीर न करणे जेणेकरून त्यांची ओळख पटू नये असे म्हंटले आहे. राहुल गांधी यांनी यासंबंधीत मुलांचा व्हिडिओ ट्विटर वर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असून तसेच