शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रायगड लोकसभा निवडणूक निकाल 2019: सुनील तटकरेंनी सर केला रायगडचा 'गड'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 2:46 PM

राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे.

रायगड - राज्यभरात शिवसेना-भाजपा युती जोरदार मुसंडी मारली असताना रायगडमध्ये मात्र युतीला धक्का बसला आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे 21 हजार मतांनी निवडून आले आहेत. तटकरेंनी केंद्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांना पराभवाचा धक्का दिला.  रायगड लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचे नेते अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये अखेरपर्यंत अटीतटीची झुंज सुरू होती. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये सुनील तटकरे यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र मतमोजणीच्या मध्यावर तटकरे यांनी घेतलेली आघाडी मोडून काढत अनंत गीते यांनी आघाडी घेतली होती. मात्र दोन्ही नेत्यांना मिळालेल्या मतांमध्ये फारसे अंतर नसल्याने या मतदारसंघात टफफाईट सुरू होती. अखेरीस सुनील तटकरे यांनी  सुनील तटकरे यांनी 21 हजार मतांनी विजय मिळवला.  कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या दोन तीन दशकात अपवाद वगळता कोकणात शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघामध्येही गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे अनंत गीते हे निवडून आले  होते. मात्र यावेळी कोकणातील शिवसेनेचा गड अडचणीत असल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या अनंत गीतेंसमोर कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे आज मतदार नेमका काय कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.  गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अनंत गीते यांना 3 लाख 96 हजार 178 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना यांना 3 लाख 94 हजार 068 मतं मिळाली होती. त्यावेळी अनंत गीते केवळ 2 हजार 110 मतांनी विजयी झाले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालraigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरेAnant Geeteअनंत गीतेNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना