प्रवीण देसाई
रायगड : हर हर महादेव...जय जिजाऊ...जय शिवराय...,जय भवानी...जय शिवाजी असा अखंड जयघोष...पारंपरिक वाद्यांचा गजर अशा उत्साही वातावरणात बुधवारी दुर्गराज रायगडावर नेत्रदीपक ३४५ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला. पालखी सोहळा, शिवकालीन युद्धकलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि शिवभक्तांचा अमाप उत्साह असे चैतन्यदायी वातावरण गडावर अनुभवायला मिळाले. सोबत धुक्याच्या दुलईने वातावरण प्रसन्नदायी झाले. या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांनी उपस्थिती लावली.
सदरेवर टीम हायकर्सतर्फे गडकिल्ल्यावरून आणलेले पाणी नेण्यात आले. शिवछत्रपतींच्या जीवनावरील शाहिरांच्या पोवाड्यांनी सदरेवरील वातावरण उर्जादायी झाले होते. सोबत जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव अशा शिवभक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. कोल्हापूरच्या मराठा लाईट इंफ्रेंट्रीच्या जवानांनी लष्कर बँडच्या सुमधुर सुरांनी मानवंदना दिली.
सोहळ्यासाठी दिल्लीसह तेरा राज्यातून मावळे उपस्थितया सोहळ्यासाठी दिल्लीसह तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तरांचल, हरीयाना(पानिपत), कर्नाटक यासह सुमारे 13 राज्यातील 80 शिवभक्त मावळे उपस्थित होते. यामध्ये बलविंदर, देसराज तुरण, डॉ.सूनिल पवार, शुभम मराठा यांच्यासह 43 रोड मराठा बांधवांचा समावेश होता. त्यांनी पानिपतहुन माती व गंगाजल आणले होते.
समितीचे हजारो हात सोहळ्यासाठी राबलेया सोहळ्याच्या तयारीसह यशस्वीतेसाठी शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अमर पाटील, विनायक फाळके, संजय पवार, हेमंत साळोखे, अजित पाटील, प्रवीण हुबाळे, सन्मान शेटे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचे हात अहोरात्र राबले.
या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजेया देशाला जिजाऊचा शिव पाहिजे, असे एकापेक्षा एक सरस पोवाडे सादर करत राज्यभरातील शाहिरांनी या सोहळ्यात शिवऊर्जा निर्माण केली.शाहीर राजेंद्र कांबळे(अकलूज), सूरज जाधव(औरंगाबाद),बाळासाहेब भगत यांचेसह कोल्हापरचे आझाद नाईकवडी यांनी पोवाडे सादर केले. तसेच कोल्हापूरचे रंगराव पाटील, दिलीप सावंत हे उपस्थित होते.
गर्व वाटत आहेया सोहळ्यासाठी आपण पहिल्यांदाच इथे आलो आहोत.छातीसगडसह विलासपूर, भिलाई, रायपूर, धमतरी या भागातून मराठा मावळे आले आहेत. या ठिकाणी आल्यावर आपल्याला गर्व वाटत आहे.-राजेश सावळे,भिलाई,छत्तीसगड
सोहळ्याला आल्यावर वेगळा आनंदतत्कालिन मराठा साम्राज्यातुन अनेक मराठा कुटुंबे हैद्राबाद येथे येऊन स्थाईक झाली. आपले मूळ इथे आहे हे समजल्यावर चांगले वाटले. तसेच या सोहळ्याला आल्यावर एक वेगळा आनंद मिळाला.-गोविंद भिसे, हैद्राबाद
बांधवाना भेटल्याने प्रेम वाढलेपानिपतच्या लढाईत आमचे पूर्वज महाराष्ट्रातून येथे आले व स्थायिक झाले. या सोहळ्याच्या निमित्ताने आमचे इथल्या मातीशी असलेले ऋणानुबंध कायम झाले.पहिल्यांदाच या सोहळ्याला आलो असून आपल्या बांधवांना भेटल्याचा आनंद आपल्याला झाला.-मराठा जगविरसिंग,पानिपत
कुरुक्षेत्र येथेही सोहळाहरियाणातील कुरुक्षेत्र येथेही बुधवारी संपूर्ण उत्तर भारतातील शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून छत्रपति शिवाजी विद्यार्थी परिषदेचे मराठा विरेंद्र वर्मा यांच्या संयोजनाने हा सोहळा होत असल्याचे जगविरसिंग यांनी सांगितले.