शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
3
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
5
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
6
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
7
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
9
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
14
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
15
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
16
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
17
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
18
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
19
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
20
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल

रायगड औद्योगिक क्रांतीचा पहिला जिल्हा बनेल

By admin | Published: February 16, 2017 4:49 AM

रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्ट

पनवेल : रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीचा पहिल्या क्र मांकाचा जिल्हा बनणार आहे, कारण याच ठिकाणी नवी मुंबई एअरपोर्टच्या रूपाने एअर कार्गो व जेएनपीटी असल्याने हे नक्कीच शक्य होणार आहे. मुंबई विमानतळाची क्षमता संपली आहे, यामुळे पर्यटक देखील याठिकाणी कमी प्रमाणात येत आहेत. अनेक एअर लाइन्स याठिकाणी आपली सेवा पुरवण्यास इच्छुक आहेत. मात्र अपुऱ्या जागेअभावी हे शक्य होत नाही. नवी मुंबई विमानतळ व एअर कार्गो सुरू होणार असल्याने पर्यटनाला देखील नक्कीच चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ उलवे येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. आपण ज्या प्रकारे एखादी चांगली बँक बघून आपले पैसे जमा करतो, यासारखेच राजकीय पक्षाचे देखील आहे. तुमच्यासमोर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासारख्या मतदानाच्या बँकांचा पर्याय आहे. मात्र यापैकी आमची भाजपा बँकच सर्वोत्कृष्ट आहे. जी तुमच्या मतांच्या रूपात ठेवलेल्या डिपॉझिटवर योग्य रूपाने तुम्हाला पाच वर्षांनी परत करू. आमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांचा पर्याय निवडल्यास त्या बँकांची अवस्था पेण अर्बन बँकेसारखी होईल, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. रायगड जिल्ह्यात भाजपा पंचायत समितीच्या ८२ आणि जिल्हा परिषदेच्या ४१ जागांवर निवडणूक लढत आहे. राज्यात भाजपाचे सरकार आहे त्याच प्रकारे तळागाळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जागेवर देखील भाजपाचे कमळ फुलविण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नैना क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्याची आणि प्रकल्पग्रस्तांच्या लीज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याची, तसेच एसईझेड रद्द करून दुसरे उद्योग याठिकाणी आणून स्थानिकांना त्यामध्ये सामावून घेण्याची मागणी केली. या जाहीर सभेला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जगदीश गायकवाड आदींसह गव्हाण जिल्हा परिषद गटाचे उमेदवार हेमंत ठाकूर, पंचायत समिती गण उमेदवार रत्नप्रभा घरत आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उलवा येथे उपस्थित होते. (प्रतिनिधी)