शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

रेल्वेला निधी पेन्शन फंड, स्थानक पुनर्विकासातून

By admin | Published: September 04, 2016 1:37 AM

जपानला ३० टक्के निधी हा ‘नॉन रेल आॅपरेशन’मधून मिळत असून, देशातील रेल्वेला मालवाहतुकीतून दोनतृतीयांश आणि प्रवासी भाड्यातून एकतृतीयांश निधी मिळतो.

मुंबई : जपानला ३० टक्के निधी हा ‘नॉन रेल आॅपरेशन’मधून मिळत असून, देशातील रेल्वेला मालवाहतुकीतून दोनतृतीयांश आणि प्रवासी भाड्यातून एकतृतीयांश निधी मिळतो. परिणामी, रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासह कर्मचारी ‘पेन्शन फंडा’तून रेल्वेसाठी निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.इंडियन मर्चंट चेंबरतर्फे ‘अ ट्रिलियन डॉलर अपॉर्च्युनिटी’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सुरेश प्रभू बोलत होते. ते म्हणाले, कर्मचारी नोकरीला लागल्यानंतर तो निवृत्त होईपर्यंतचा कालावधी मोठा असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पेन्शन फंड वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, स्थानकांच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात हबीबगंज रेल्वे स्थानकातून झाली आहे. रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना बस, रिक्षा आणि टॅक्सी सेवांना संबंधित रेल्वे स्थानकांशी एकात्मिक वाहतूक प्रणालीद्वारे जोडले जाईल. महत्त्वाचे म्हणजे हा जगातील सर्वांत मोठा स्थानिक पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून, याद्वारे १० हजार कोटींचा निधी उभारण्यात येईल. (प्रतिनिधी)मुंबई-अहमदाबाद बुलेट टे्रनसाठी ५० वर्षांच्या कालावधीकरिता जपानमधील जायका या वित्त संस्थेने ०.१ टक्के व्याजदाराने एक लाख कोटींचे कर्ज दिले आहे. पहिली १५ वर्षे जायका एकही पैसा घेणार नाही. २०१७ ते २०२३ या सहा वर्षांत ५०८ किलोमीटरचा हा हायस्पीड टे्रनचा प्रकल्प पूर्ण होईल.- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री- रेल्वेमार्गांच्या दुपदरीकरणासह चौपदरीकरणाची कामे निधीअभावी रखडली असून, रेल्वे संबंधित राज्य सरकारसोबत सहभागाचे करार पीपीपी मॉडेलद्वारे करून प्रकल्प राबवेल, असेही प्रभू यांनी सांगितले.