शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

रेल्वे होमगार्डच्या बनावट हजेरीचा मोठा घोटाळा उघड

By admin | Published: November 02, 2016 5:37 AM

लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये नेमण्यात येणाऱ्या होमगार्ड्सबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला

जमीर काझी,

मुंबई- लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रेल्वेमध्ये नेमण्यात येणाऱ्या होमगार्ड्सबाबत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बंदोबस्ताची ड्यूटी नसताना दैनंदिन भत्त्यासाठी बनावट हजेरीपत्रके बनवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. हा नेमका आकडा निश्चित झालेला नसला तरी ही रक्कम लाखोंच्या घरात असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांसह रेल्वे पोलीस व होमगार्डच्या मुख्यालयातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा गैरव्यवहार झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. होमगार्ड कर्तव्यावर हजर नसताना त्यांची अधिक दिवस हजेरी दाखवून ही रक्कम उकळण्यात आली आहे.होमगार्ड महासमादेशकांकडे आलेल्या एका तक्रारीवर झालेल्या तपासात जानेवारी २०१४ मध्ये बनावट हजेरीपत्रकाद्वारे हजारो रुपये भत्त्याच्या रुपात उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत रेल्वे पोलिसांकडे फिर्याद करण्यात आली आहे. अशाच प्रकारे अन्य महिन्यांची बनावट हजेरी देयके बनवून सरकारी रकमेची लूट झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना मानधन तत्त्वावर मदत करणारी ‘होमगार्ड’ही यंत्रणा गृह विभागाच्या अखत्यारित स्वतंत्रपणे कार्यरत आहे. होमगार्ड्सकडे पोलिसांइतके अधिकार नसले तरी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक केली जाते. त्या बदल्यात १० तासांच्या ड्यूटीसाठी एका होमगार्डला दिवसाला ३५० रुपये मानधन दिले जाते. त्यांची हजेरी संबंधित नियुक्तीच्या परिसरातील पोलीस ठाण्यातून नोंदविली जाते. त्यांच्याकडून दर महिन्याला देयक बिल आल्यानंतर ते होमगार्डच्या कार्यालयात पाठवून मंजूर केली जातात. २०१४ च्या जानेवारी महिन्यात रेल्वेमध्ये नेमणुकीला असलेल्या होमगार्डच्या हजेरी भत्त्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार विभागाचे महासमादेशक राकेश मारिया यांच्याकडे आली होती. त्यावर उपमहासमादेशक संजय पांडे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी समिती नेमून सविस्तर चौकशी करण्यात आली आहे. रेल्वेतील विविध पोलीस ठाण्यांकडून दाखल झालेली बनावट हजेरीपत्रके, देयके व त्यासाठी संबंधित होमगार्ड, पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि गृहरक्षक दलातील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई विभागाचे समादेशक विद्यासागर भोले यांनी रेल्वे पोलीस (जीआरपी) कडे फिर्याद दिली आहे.>संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावाहोमगार्डची बनावट हजेरी प्रमाणपत्र व देयकामध्ये तफावत मोठी तफावत आहे. त्यात चौकशी समितीने दोषी ठरविलेल्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. या फसवणुकीप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे रीतसर फिर्याद दाखल केली आहे. मुुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत नेमणुकीला असलेल्या होमगार्डच्या बाबतीत असा गैरव्यवहार झाल्याच्या शक्यतेने त्यांनाही तपास करण्याबाबत कळविलेले आहे. विभागाकडून याप्रकरणी पाठपुरावा केला जात आहे. - संजय पाडे, उपमहासमादेशक, गृहरक्षक दल व नागरी सेवा>अशी झाली फसवणूकरेल्वेला जानेवारी २०१४ महिन्यात पुरविण्यात आलेल्या बंदोबस्तात होमगार्डच्या हजेरी प्रमाणपत्रात सीएसटी, मुंबई सेंट्रल व वडाळा रेल्वे स्टेशन या ठिकाणच्या काही गार्डची हजेरी, प्रत्यक्षात उपस्थिती व सादर केलेल्या देयकामध्ये मोठी तफावत आहे.>या गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी समितीने विविध परिमंडळांतील क्षेत्र समादेशक अधिकारी नलिनी पाटकर, एस. एच. वाडेकर, तोरस्कर, पी. एन. पाटील, एम. एन. पांचाळ, यू. जी. पाटील तसेच बिले बनविणारे निलेश जाधव, महिला होमगार्ड कौमुदी बसनाक, संचित साळवी, पलटन नायक रमेश सुर्वे, उषा देवकुळे, व्ही. टी. शिंदे यांना दोषी ठरविले आहे.काही पोलीस ठाण्याच्या ठिकाणी होमगार्ड २० दिवस हजर असताना २८ दिवस, तर काही ठिकाणी २२ च्या जागी २६ व ३० दिवसांची हजेरीची बिले बनवून अतिरिक्त भत्ता लुटण्यात आल्याचे समितीच्या अहवालात नमूद केले आहे.