मुंबई : इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे पिण्याच्या पाण्यासाठी ‘रेल नीर’ नावाच्या पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. या बाटल्यांचे वितरण संपूर्ण मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवर होते. आयआरसीटीसीचे ‘रेल नीर’चे पाणी सर्व प्रवासी पितात, मात्र हे पाणी रेल्वे अधिकाऱ्यांच्या पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. आयआरसीटीसीच्या कार्यालयातच खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
सीएसएमटी येथील आयआरसीटीसीच्या कार्यालयात, महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांच्या कार्यालयात दररोज खासगी कंपनीच्या बाटल्या पुरविल्या जातात. आयआरसीटीसीच्या कार्यालयात दर दिवशी २० लीटरच्या १० ते १५ बाटल्या येतात.महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक आणि इतर अन्य कर्मचाºयांसाठी दर दिवशी २० लीटरच्या ८० ते १०० बाटल्या पुरविल्या जातात. तर, काही अधिकाºयांच्या कार्यालयात खासगी कंपनीच्या महागड्या पाण्याच्या बाटल्या पुरविल्या जातात, अशी माहिती खासगी पाणी विक्रेत्याने दिली.
आयआरसीटीसीद्वारे रेल नीर आणि रेल्वे स्थानकांवर वॉटर व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात पाणी दिले जाते. मात्र रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यापासून दूर राहिले आहेत. रेल्वे अधिकारी खासगी कंपनीचे पाणी पिण्यात सुख मानत असल्याचे पाहायला मिळते.
आयआरसीटीसीद्वारे तयार केलेल्या ‘रेल नीर’ पाण्याच्या बाटल्या या रेल्वे स्थानक, एक्स्प्रेसमध्ये विकल्या जातात. हे पाणी प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ‘रेल नीर’च्या बाटल्या अधिकारी किंवा कर्मचारी खरेदी करून पिऊ शकतात. पण आयआरसीटीसीद्वारे येणाºया रेल नीर पाण्याच्या बाटल्या रेल्वे कार्यालयात पुरविण्याची तरतूद नाही, असे आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.
... म्हणूनच रेल नीरला नकारच्रेल नीरच्या बाटल्या फक्त एक लीटरच्या आहेत.च्रेल नीरच्या बाटल्यांचा पुरवठा फक्त रेल्वे स्थानक आणि एक्स्प्रेसमध्ये केला जातो.च्रेल नीरच्या बाटल्याचा पुरवठा रेल्वे कार्यालयात करण्याची तरतूद नाही.च्रेल नीरच्या बाटल्या २० लीटरच्या नाहीत. रेल नीरच्या बाटल्यांची निर्मिती मर्यादित केली जाते.