वसई : लोकलमध्ये मर्कटलीला करून स्टंटबाजी, हुल्लडबाजी, धावती लोकल पकडणे, प्रवाशांच्या डोक्यावर टपली मारणे, दरवाज्यात लटकणे, लोकलच्या टपावर व कपलींगवर प्रवास करणाऱ्या १५६ तरुणांवर पश्चिम रेल्वेच्या वसई रोड पोलिसांनी कारवाई केली. यातील सर्वाधिक स्टंटबाज नालासोपारा स्टेशनवर पकडण्यात आले आहेत. या हुल्लडबाजांना वेसण घालण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केले आहे.वैतरणा ते मीरा रोड दरम्यानच्या सात रेल्वे स्थानकांच्या हद्दीत गेल्या सात महिन्यात ही कारवाई करण्यात आली. याच काळात २४९ अल्पवयीन मुले हरवली होती. त्या सर्व मुलांना शोधून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. लोकलमध्ये १०६ चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास प्रगती पथावर असून ५४ प्रकरणाचा गुंता सोडवण्यात आला आहे. ४४ पाकिटमारीच्या घटनांपैकी ३१ गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे. हरवलेल्या व गहाळ झालेल्या ४४ घटनातील २९ प्रवाशांच्या महागडा वस्तूंचा शोध लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>डीसीपींच्या आदेशानुसार हुल्लडबाजी रोखण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. त्या द्वारे गेल्या सात महिन्यात स्टेशनवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. ती अशीच सुुरु राहणार असून हद्दीतील स्टंटबाजांचा कामस्वरुपी उपाय केला जाणार आहे.-महेश बागवे, पोलीस निरीक्षक, वसई
लोकलमधील हुल्लडबाजांवर रेल्वे पोलिसांची कारवाई
By admin | Published: August 25, 2016 3:23 AM