शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

रेल्वे स्थानक बलात्कार, आरोपीस अटक नाही

By admin | Published: September 24, 2016 3:19 AM

अनिल अवसरमोल याला लागलीच अटक न करता गरज भासेल तेव्हा पोलीस ठाण्यात हजर करण्यासंदर्भात लेखी आश्वासन त्याच्या आईकडून घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

ठाणे/कल्याण : अल्पवयीन मुलीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणात फरार दाखवलेला आरोपी अनिल अवसरमोल याला लागलीच अटक न करता गरज भासेल तेव्हा पोलीस ठाण्यात हजर करण्यासंदर्भात लेखी आश्वासन त्याच्या आईकडून घेतल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.मुंब्रा येथे राहणाऱ्या १७ वर्षांच्या पीडित मुलीचा वडिलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे तिने घर सोडून कल्याण स्थानक गाठले. त्या वेळी कल्याण स्थानकातील शौचालयाची साफसफाई करणाऱ्या अनिलने तिला पाहिले. ती एकटी असल्याने अनिलने तिला सहानभूती दाखवत आसरा देण्याचा बहाणा केला. त्याने तिला फलाट क्रमांक दोन-तीनवरील महिलांच्या शौचालयात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर रात्री उशीर झाल्याने तिला खडवली येथे मित्राच्या घरी नेले. दुसऱ्या दिवशी त्याने तिला टावरीपाडा येथील घरी नेले. तेथे तिला चार-पाच दिवस ठेवले. अनिल आपल्याशी लग्न करेल, अशा भाबड्या आशेवर ती मुलगी त्याच्यासोबत राहत होती. तिने लग्नाबाबत विचारणा करताच त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने अनिलला धडा शिकवण्यासाठी खडकपाडा ठाण्यात तक्रार दिली. अत्याचाराचा पहिला प्रकार हा कल्याण रेल्वेच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा तेथे प्रथम दाखल होईल, असे खडकपाडा पोलिसांना वाटले. मात्र, आपल्या हद्दीत असा कोणताच प्रकार घडला नाही, अशी भूमिका कल्याण रेल्वे पोलिसांनी घेतल्याने खडकपाडा पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिल्याचे कल्याण पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)