शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

राज्यातील रेल्वे स्टेशनही शहरांप्रमाणेच अस्वच्छ

By admin | Published: May 18, 2017 4:26 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बहुतांश शहरे गलिच्छ ठरल्यानंतर, बुधवारी देशातील

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील बहुतांश शहरे गलिच्छ ठरल्यानंतर, बुधवारी देशातील प्रमुख रेल्वे स्टेशनची स्वच्छता क्रमवारी जाहीर झाली आणि राज्यातील शहरांप्रमाणे रेल्वे स्टेशनही स्वच्छतेऐवजी अस्वच्छतेत पुढे असल्याचे दिसून आले.‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ या त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या देशातील रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता सर्वेक्षणाचा अहवाल व क्रमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभाकर प्रभू यांनी प्रसिद्ध केला, त्याच वेळी प्रभू यांनी ‘स्वच्छ रेल पोर्टल’चेही उद््घाटन केले.‘ए १’ श्रेणीतील ७५ व ‘ए’ श्रेणीतील ३३२ अशा एकूण ४०७ प्रमुख रेल्वे स्थानकांचे हे स्वच्छता सर्वेक्षण केले गेले होते. या दोन्ही श्रेणींमध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले १० क्रमांक पटकाविणाऱ्या स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील तीन स्थानकांचा समावेश आहे. ‘ए-१’ श्रेणीमध्ये पुणे नवव्या तर ‘ए’ श्रेणीमध्ये अहमदनगर स्टेशन क्रमवारीत तिसऱ्या आणि बडनेरा सहाव्या क्रमांकावर आले. संपूर्ण देशाचा श्रेणीनिरपेक्ष विचार केला, तर पुण्याला १९ वा तर बडनेराचा ११ क्रमांक लागला. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवासी व ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात गजबजलेली स्टेशन अशी ओळख असलेल्या मुंबईतील मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीएम) ही स्टेशन स्वच्छतेच्या क्रमवारीत पार तळाला गेली. मुंबई सेंट्रलला ८६ वा, ‘सीएसटी’ला १५३ वा आणि ‘एलटीएम’ला २७८ वा क्रमांक मिळाला. या सर्वेक्षणात राज्यातील एकूण ३४ रेल्वे स्टेशनमधील स्वच्छतेचा लेखाजोखा घेतला गेला. यापैकी क्रमवारीत चौथे आलेले अहमदनगर सर्वात वरच्या स्थानवर तर नगरसूल ३९३ व्या स्थानावर आले.राज्यातील रेल्वे स्टेशनची क्रमवारी...अहमदनगर (४), बडनोरा (११), पुणे (१७), अमरावती (२२), बल्लारशा (३३), चंद्रपूर (३८), भुसावळ (४२), लोणावळा (४७), अकोला (६४), सोलापूर (६७), शिर्डी (७३), लातूर (७७), कोपरगाव (७८), मुंबई सेंट्रल (८६), परभणी (११५), गोंदिया (११६), कोल्हापूर (१४१), मिरज (१४६), मुंबई सीएसटी (१५३), पनवेल (१५६), जळगाव (१६०), नांदेड (१६१), नाशिक रोड (१६९), औरंगाबाद (१७९), जालना (१८६), मनमाड (२२७), नागपूर (२३७), चाळीसगाव (२४०), शेगाव (२४९), लोकमान्य टिळक टर्मिनस (२७८), कल्याण (३०२), ठाणे (३०६), दादर (३३०) आणि नगरसूल (३९३).मनमाड-जळगाव दरम्यान तिसऱ्या रेल्वेलाइनला मंजुरी...

वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वात गजबजलेल्या रेल्वेमार्गांपैकी एक असलेल्या मनमाड ते जळगाव दरम्यान तिसरी रेल्वेलाइन टाकण्याच्या कामास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबीविषयक समितीने बुधवारी मंजुरी दिली.या निर्णयाची माहिती देताना ऊजामंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, १६० किमी लांबीच्या या रेल्वेलाइनसाठी १,१९९ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हे काम पाच वर्षांत पूर्ण केले जाईल.मुंबई-दिल्ली व मुंबई-कोलकाता या मार्गावर मनमाड-जळगाव हा प्रवासी व मालवाहतुकीच्या दृष्टीने खूप गजबजलेला रूट आहे. अतिरिक्त रेल्वेलाइनमुळे या दोन्ही मार्गांवरील वाहतूक अधिक सुलभ होईल.