खालापूर : खोपोली रेल्वेस्थानकात रात्रीच्या वेळी मद्यपी, गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खोपोलीसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.खोपोली रेल्वे स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. या स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असूनही त्यावर कोणतीही ठोस उपायोजना करताना रेल्वे प्रशासन दिसत नाही. रात्री मोठ्या प्रमाणात मद्यपी तसेच गर्दुल्ल्यांनी रेल्वे स्थानकाला अड्डा बनविला असल्याने रात्री ये-जा करत असताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मद्यपींवर कारवाई होणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.प्रवाशांच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजलेले असताना प्रवाशांना कोणत्याही सोयी - सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. रेल्वे स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी साधे बाकडेही नाहीत.
रेल्वे स्थानकात गर्दुल्ल्यांचा वावर
By admin | Published: June 13, 2016 3:18 AM