रेल्वेची तिकीटे तीन महिने आधीच आरक्षित होतात. यामुळे रेल्वेने तात्काळ तिकिटांची सोय केली आहे. मात्र, तात्काळ तिकिटेही काढताना अनेक समस्या भेडसावत आहेत. आज सकाळी तात्काळ तिकीटे काढताना वेबसाईटच ठप्प झाली होती. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
आयआरसीटीसीवर एसी आणि सामान्य तिकिटांसाठी वेगवेगळी वेळ देण्यात आली आहे. मात्र, तरीही तिकिटे मिळविणे कठीण जात आहे. आज तात्काळ तिकिटांची वेळ सुरु झाल्यावर युजरनी वेगवेगळ्या माध्यमांतून लॉग ईन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समस्या निर्माण झाल्या. यावेळी पेजवर मेन्टेनन्सचे मॅसेज येत होते. यामुळे आवश्यक असताना तिकिटे न मिळाल्याचा संताप युजरनी सोशल मिडीयावर व्यक्त केला. अनेकांनी साईट ठप्प झाल्याचे स्क्रीनशॉटही टाकले आहेत.
वेबसाईट ठप्प झाल्यानंतर जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर रेल्वेच्या हेल्पलाईन नंबरचा वापर करावा. जर तुम्हाला तिकिट रदद् करायची असल्यास किंवा टीडीआर फाईल करायची असल्यास 0755-6610661, 0755-4090600, 0755-3934141 वर फोन करू शकता. etickets@irctc.co.in या मेल आयडीवरही तक्रार करू शकता.
आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प झाल्याप्रकरणी अद्याप रेल्वे मंत्रालय आणि आयआरसीटीसीकडून कोणतीही माहिती आलेली नाही.