मुंबई : केंद्र सरकारने रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ केल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला 21 जूनपासून सुरू झालेल्या हंगामी तिकीट विक्रीतून 70 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. 20 जून रोजी रेल्वेने तिकिटांच्या दरात 100 टक्के ते 187 टक्क्यांची वाढ केली होती. त्याच्या दुस:याच दिवसापासूनच्या हंगामी तिकीट विक्रीतून रेल्वेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. 21 जून ते 24 जून या चार दिवसांत विकण्यात आलेल्या हंगामी तिकिटांतून मध्य रेल्वेला 29.91 कोटी रुपये मिळाले. (प्रतिनिधी)
हंगामी तिकीट विक्रीतून रेल्वेला मिळाले 70 कोटी
By admin | Published: June 26, 2014 10:16 PM